सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला

शेअर बाजारात तेजी असण्याचा आज सलग तिसरा दिवस आहे. आज अॅक्सिस बँक आणि सिटी बँकेच्या भारतीय रिटेल व्यवसायाच्या खरेदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. हा करार सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा असू शकतो. यामुळे अॅक्सिस बँकेचे शेअर मोठ्या प्रमाणात तेजीत आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला
शे
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 12:32 PM

मुंबई : आज सलग तिसऱ्या दिवशी (Share Market Update) शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. सेन्सेक्समध्ये (Sensex) सध्या 700 हून अधिक अंकांची वाढ पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटांनी सेन्सेक्सने 654 अंकांची उसळी घेतली. तेजीचे सत्र निफ्टीत ही दिसून आले. निफ्टीत 165 अंकांची वाढ दिसून येत असून तो 17,4990 अंकाच्या पातळीवर व्यवहार करीत होता. सेन्सेक्सच्या टॉप-30 मधील 24 शेअर्स तेजीसह ट्रेड करत आहेत आणि सहा शेअर्स घसरणीसह ट्रेड करत आहेत. बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. तर टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि सन फार्मात सर्वात मोठी घसरण दिसून येत आहे.देशातील आघाडीची तेल आणि वायू उत्पादक कंपनी ‘ओएनजीसी’मधील (ONGC) दीड टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी सरकार या आठवड्यात सुमारे तीन हजार कोटी रुपयांना विकणार आहे.

जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये आलेली तेजी यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला होता. शेअर बाजारांतून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी 35.47 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.

रशिया- युक्रेनची सकारात्मक वाटचाल

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देश युद्ध विरामासाठी चर्चेच्या दिशेने सरसावले आहेत. यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाले आहेत. निफ्टी 17500 ची पातळी ओलांडेल आणि वित्तीय क्षेत्र त्यात मोठे योगदान देईल, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या घडामोडींवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा ही परिणाम दिसून येईल.

ओएनजीसीची घसरगुंडी

देशातील आघाडीची तेल आणि वायू उत्पादक कंपनी ‘ओएनजीसी’मधील दीड टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी सरकार या आठवड्यात सुमारे तीन हजार कोटी रुपयांना विकणार आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ONGC) मंगळवारी शेअर बाजारांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सरकारची विक्री ऑफर 30 मार्च रोजी उघडेल आणि 31 मार्च रोजी बंद होईल. ‘प्रवर्तकाने (Government) 30 मार्च 2022 रोजी कंपनीचे 9,43,52,094 शेअर्स बिगर-किरकोळ गुंतवणूकदारांना आणि 31 मार्च रोजी किरकोळ गुंतवणूकदारांना विकण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच जास्त बोली लागल्यास 9,43,52,094 अतिरिक्त इक्विटी शेअर्सची विक्री करण्याचा पर्याय निवडला आहे.” विक्री ऑफरची किंमत प्रति शेअर 159 रुपये ठेवण्यात आली आहे. या वृत्तानंतर ओएनजीसीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यावेळी ओएनजीसीचा शेअर 163.50 रुपयांवर व्यवहार करत होता.

संबंधित बातम्या :

 Dombivli मध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसलेल्या दारुड्याला महिलेचा चोप

Vasai मध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; बेदम मारहाण, दुचाकीही फोडली

‘ये XXX रोता क्यू है’, नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.