तेजीच्या घौडदौडीला ‘ब्रेक’; सेंन्सेक्स 12 अंकांनी घसरला, मार्केटमध्ये आयटीची बूम!

सलग पाच दिवसांच्या मार्केटच्या घौडदोडीला आज ‘ब्रेक’ लागला. आज (शुक्रवारी) सेन्सेंक्स (SENSEX) 12.27 अंकांच्या (0.02%) घसरणीसह 61,223.03 वर बंद झाला आणि निफ्टी 2 अंकांच्या घसरणीसह (0.01%) 18,255.80 वर पोहोचला.

तेजीच्या घौडदौडीला ‘ब्रेक’; सेंन्सेक्स 12 अंकांनी घसरला, मार्केटमध्ये आयटीची बूम!
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 5:12 PM

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सलग पाच दिवसांच्या मार्केटच्या घौडदोडीला आज ‘ब्रेक’ लागला. आज (शुक्रवारी) सेन्सेंक्स (SENSEX) 12.27 अंकांच्या (0.02%) घसरणीसह 61,223.03 वर बंद झाला आणि निफ्टी 2 अंकांच्या घसरणीसह (0.01%) 18,255.80 वर पोहोचला. आयटी, कॅपिटल गुड्स, पॉवर, युटिलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. एशियन पेंट्स, (ASIAN PAINTS) , अक्सिस बँक, एचयूएल (HUL) आणि ओएनजीसी (ONGC) निफ्टीत सर्वाधिक घसरणीचे ठरले. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, आयओसी(IOC), टीसीएस(TCS), इन्फोसिस आणि लार्सन अँड टूब्रो सर्वाधिक वाढ नोंदविली गेली. काल (गुरुवारी) प्रमुख निर्देशांक बीएसई (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NSE) वाढीचा आलेख चढाच राहिला होता. सेंन्सेक्स 85.26 अंकाच्या वाढीसह (0.14%) 61,235.30 वर बंद झाला होता. निफ्टी 45.45 अंकांच्या तेजीसह (0.25%) 18,257.80 वर बंद झाला होता.

आजची टॉप कामगिरी:

• टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट (4.42) • टीसीएस (1.80) • आयओसी (1.77) • इन्फोसिस (1.72) • लार्सेन (1.31)

आजची घसरणीची कामगिरी:

• एशियन पेंमट्स (-2.66) • अक्सिस बँक (-2.57) • एचयूएल (-2.09) • यूपीएल (-1.94) • ओएनजीसी (-1.77)

गेल्या पाच दिवसांतील सेन्सेंक्सची आकडेवारी दृष्टीक्षेपात-

• 14 जानेवारी 61,223.03 • 13 जानेवारी 61,235.30 • 12 जानेवारी 61,150.04 • 11 जानेवारी 60,616.89 • 10 जानेवारी 60,395.63

टीसीएसचा ‘बायबॅक’चा निर्णय

भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसने ( Tata Consultancy Services) आर्थिक तिमाहीची आकडेवारी या आठवड्यात घोषित केली. टीसीएसने 18 हजार कोटी शेअर्स बायबॅक (Buyback) आणि डिव्हिडंडचा (Dividend) निर्णय घेतला आहे. टीसीएसच्या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात 12 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. कंपनीने उत्पन्न 16 टक्क्यांच्या वाढीसह 49 हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. टीसीएस 4500 रुपये प्रति शेयर किंमतीवर शेअर बायबॅक करण्याचा निर्णयामुळे शेअर्स मार्केटमध्ये टीसीएस व टाटांच्या शेअर्समध्ये तेजीचं वातावरण दिसून आलं.

आयटीची बूम:

आज (शुक्रवारी) आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी आर्थिक तिमाहीची आकडेवारी घोषित केली. टीसीएस आणि इन्फोसिसच्या नफ्यात मोठी वाढ दिसून आली. टीसीएसला 9,769 कोटी आणि इन्फोसिसला 5,809 कोटींचा नफा झाला. काल(गुरुवार) प्रमाणेच आजही मार्केटला आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सावरल्याचं चित्र होतं.

भारताच्या विकास दरावर ‘संक्रांत’? संयुक्त राष्ट्राच्या अहवालात विकासाला वाकुल्या, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे अपेक्षित दर गाठता येईना 

LIC IPO : या आर्थिक वर्षातच एलआयसीचा आयपीओ, युद्धपातळीवर सर्व प्रकारच्या प्रक्रिया सुरू

Inflation Rate | महंगाई डायन खाए जात, डिसेंबरमध्ये महागाई दराची मोठी उसळी, साडेपाच टक्क्यांच्या पार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.