पेनी स्टॉकची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने सहा महिन्यांत दिला 6 हजार टक्क्यांपेक्षा अधिक परतावा

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरने वर्षभरात 17552 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

पेनी स्टॉकची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; 'या' कंपनीच्या शेअर्सने सहा महिन्यांत दिला 6 हजार टक्क्यांपेक्षा अधिक परतावा
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 6:34 AM

मुंबई : जगासह देशावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये सर्व आर्थिक व्यवहारा ठप्प झाले होते. सर्व उद्योगधंदे बंद होते याचा मोठा फटका हा वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांना बसला. लॉकडाऊनच्या चक्रातून शेअरबाजाराची देखील सुटका झाली नाही. या काळात अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर कोसळले. गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. मात्र यात देखील काही शेअर (Stock) असे होते की, त्यांनी गुंतवणूकदारांना मालामल केले. त्या शेअरमध्ये जोखमी घेत गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांचा निर्णय योग्य राहीलला. आज आपण अशाच एक कंपनीच्या शेअरबद्दल जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षभरात या कंपनीचा शेअर 35 पैशांनहून 63 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यात या पेनी स्टॉकने (Penny Stock) गुंतवणूकदारांना छप्पर फाडके परतावा दिला आहे. हा शेअर आहे कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (Kaiser Corporation Limited) या कंपनीचा आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 17552 टक्के परतावा दिला आहे.

अपेक्षेपेक्षा जास्त परतावा

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सहा महिन्यात 6192 टक्के परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी या शेअर्सची किंमत अवघी 35 पैशे इतकी होती. तर सहा महिन्यानंतर ती वाढून 95 पैशांवर पोहोचली. सहा महिन्यांपूर्वी अवघी 95 पैसे असलेल्या या शेअर्सची किंमत आज 63 रुपयांवर पोहोचली आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर्स पाच टक्क्यांच्या तेजीसह 60.55 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. सुरुवातील हा शेअर्स 63 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली. मात्र गुरुवारी या घसरणीला ब्रेक लागला, शेअर्समध्ये वाढ होऊन तो 60.55 रुपयांवर पोहोचला.

गुंतवणूकदारांना किती परतावा मिळावा?

या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदाराना छप्पड फाड के पैसे कमावण्याची संधी दिली. वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघी 35 पैशे इतकी होती. सहा महिन्यानंतर ती वाढून 95 पैशांवर पोहोचली. मात्र त्यानंतर या कंपनीच्या शेअर्सने रॉकेटचा वेग पकडला. सहा महिन्यांपूर्वी अवघी 95 पैशे किंमत असलेला हा शेअर्स मागील सहा महिन्यांत 63 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरता तब्बल 17552 टक्क्यांची वाढ झाली आहे. समजा तुम्ही एक महिन्यापूर्वी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्हाला 21 लाखांहून अधिक परतावा मिळाला असता. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून, तीची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली होती. ती ट्रेडिंग आणि वितरण क्षेत्रात काम करते.

हे सुद्धा वाचा

टीप : गुंतवणूकदारांनी या बातमीत दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही गुंतवणूक करू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्यावा. ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यामधून गुंतवणुकीचा कोणताही सल्ला देण्यात येत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.