Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज मंजुरीला ‘सिबिल’चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स

तुमचा सिबिल स्कोअर अर्थजगतात सर्वत्र पोहोचतो. तुमच्या सिबिल स्कोअरची निगेटिव्ह रँकिंग प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेकडे अद्ययावत असते. तुम्ही गृह कर्ज घेण्यासाठी बँकेकडे गेल्यास किंवा कार लोनची फायनान्स एजन्सीकडे मागणी केली तुमचा निगेटिव्ह सिबिल स्कोअर अडथळा ठरू शकतो.

कर्ज मंजुरीला 'सिबिल'चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स
सिबिल
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 8:27 AM

नवी दिल्ली- डिफॉल्ट कर्ज किंवा विहित वेळेत कर्ज रकमेची पूर्ती न केल्यामुळे सिबिल स्कोअरवर परिणाम होतो. परीक्षेत विद्यार्थ्यांने योग्य कामगिरी न केल्यास निकालपत्रिकेतील गुणांवर फटका बसतो. त्यामुळे भविष्यात सर्वोत्तम महाविद्यालयातील प्रवेशाला मुकावे लागते. समान परिस्थिती कर्ज डिफॉल्ट होण्यावेळी निर्माण होते. कर्ज डिफॉल्टच्या स्थितीत सिबिल स्कोअर कमी होतो. त्यामुळे कर्ज मिळविण्यास अडचणी निर्माण होतात किंवा अधिक प्रक्रिया शुल्कासहित व्याजदराचा भुर्दंड सहन करावा लागतो.

सिबिल स्कोअर मधील घसरणीचा परिणाम दीर्घकालीन असतो का? सिबिल स्कोअर सुधारणेची संधी मिळते का? सिबिल स्कोअरची कामगिरी उंचाविण्याची संधी निश्चितच मिळते. त्यामुळे भविष्यात कर्ज मिळविण्याच्या अधिक शक्यता निर्माण होतात.

सिबिल स्कोअरचं गणित उदाहरणावरुन समजून घ्या. तुम्ही घर बनविण्यासाठी बँककडून कर्ज घेतल्याचे गृहित धरा. तुम्ही कर्जाचे हफ्ते विहित मर्यादेत अदा करत होता. अचानकपणे लॉकडाउनला सामोरे जावे लागले आणि तुमचे अर्थचक्र मंदावले. तुमचे हफ्ता भरण्याचे गणित बिघडले. तुमचे कर्जाचे हफ्ते थकल्याने बँकेने तुम्हाला डिफॉल्ट श्रेणीत वर्ग केले.

आर्थिक स्थिती रुळावर आल्यावर तुम्ही थकित कर्जाचे हफ्ते व व्याजही अदा केले. तुम्हाला सिबिल स्कोअर सुधारण्याची आशा निर्माण झाली. तुम्ही व्यक्त केलेली आशा निश्चितच योग्य आहे. मात्र, अर्थतज्ज्ञांच्या मते सिबिल स्कोअरवरील परिणाम किमान दोन वर्षांसाठी कायम राहतो. थकित हफ्त्यांची वेळेत पूर्तता असो किंवा व्याजाची पूर्तता मात्र सिबिल स्कोअरवरील परिणाम दोन वर्षांसाठी कायम राहतो. तुमच्या वित्तीय गरजांवर थेट परिणाम दिसून येतो.

अर्थव्यवहारावर इफेक्ट:

तुमचा सिबिल स्कोअर अर्थजगतात सर्वत्र पोहोचतो. तुमच्या सिबिल स्कोअरची निगेटिव्ह रँकिंग प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेकडे अद्ययावत असते. तुम्ही गृह कर्ज घेण्यासाठी बँकेकडे गेल्यास किंवा कार लोनची फायनान्स एजन्सीकडे मागणी केली तुमचा निगेटिव्ह सिबिल स्कोअर अडथळा ठरू शकतो. तुम्ही अन्य मार्गाने कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अधिक व्याजदरानेच कर्ज घ्यावे लागेल.

सिबिल स्कोअर कसा सुधारावा?

तुमचे विहित वेळेतील आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट कार्ड सारख्या छोटे-मोठे बिल देय करण्याद्वारे सिबिल स्कोअरमध्ये सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी येते. तुमच्या बिलांचे पेमेंट वेळेवर करा. वेळेत बिल अदा करा आणि क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल भरा. या आर्थिक कृतीमुळे सिबिल स्कोअरमध्ये सुधारण्याची शक्यता असते.कर्ज वेळेवर अदा करुनही बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले जात नाही. त्यामुळे सिबिल स्कोअर निगेटिव्ह होतो. क्रेडिट कार्ड बंद झाल्यानंतर बँकेचे त्वरित प्रमाणपत्र घ्या. सर्व गोष्टींमुळे सिबिल स्कोअर सुधारतो.

हे सुद्धा वाचा: Winter : थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक मात्र, ‘या’ फळ बागेसाठी आहे धोक्याची घंटा, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार

Happy Birthday Aditya Pancholi | फिल्मी करिअरसाठी निर्मल पांचोली ‘आदित्य पांचोली’ बनला! वाचा त्याचा बॉलिवूड प्रवास…

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.