PharmEasy चे संस्थापक सिद्धार्थ शाहांचा धमाका, मुंबईत अपार्टमेंट खरेदी, किंमत तब्बल…
Siddharth Shah Apartment : महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील स्टॅम्प ड्युटी सवलतीच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च रोजी या या व्यवहारावर सह्या झाल्या. तर ही प्रॉपर्टी 20 ऑगस्ट 2021 रोजी रजिस्टर करण्यात आली. या संपत्तीसाठी स्टॅम्प ड्युटीपोटी तब्बल 1.5 कोटी रुपये शाह यांना भरावे लागले.
मुंबई : नुकतंच थायरोकेयर (Thyrocare) ही कंपनी अधिगृहित करणारी ऑनलाईन फार्मसी चेन फार्म इजी ( PharmEasy) चे संस्थापक सिद्धार्थ शाह (Siddharth Shah) यांनी मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे. सिद्धार्थ शाह यांनी मुंबईतील खार पश्चिम इथे मोठी अपार्टमेंट खरेदी केली आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 40 कोटी रुपये आहे. जैपकी.कॉम या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार ही अपार्टमेंट सहा मजली आहे. 3963 वर्ग फूट परिसरात ही पसरली आहे. या अपार्टमेंटमध्ये तीन कार पार्किंग स्लॉट आहेत.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील स्टॅम्प ड्युटी सवलतीच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च रोजी या या व्यवहारावर सह्या झाल्या. तर ही प्रॉपर्टी 20 ऑगस्ट 2021 रोजी रजिस्टर करण्यात आली. या संपत्तीसाठी स्टॅम्प ड्युटीपोटी तब्बल 1.5 कोटी रुपये शाह यांना भरावे लागले. वाधवा ग्रुप (Wadhwa Group) यांच्या खार पश्चिमेकडील वाधवा समर्पण (Wadhwa Samarpan) हा प्रकल्प आहे. त्यामध्ये सिद्धार्थ शाह यांनी अपार्टमेंट खरेदी केली आहे.
थायरोकेयरची खरेदी
नुकतंच PharmEasy ने प्रसिद्ध अशा थायरोकेयर लॅबची खरेदी केली. या अधिग्रहणाची चर्चा व्यापर विश्वात होती. जवळपास 9 अब्ज डॉलरचा IPO लाँच करण्याची योजना या कंपनीची आहे. थायरोकेयरच्या अधिग्रहणासाठी फार्म इजीने आपल्या सध्याच्या गुंतवणूकदारांकडून अतिरिक्त 30 कोटी डॉलर गोळा केले.
API Holdings ही कंपनीसुद्धा PharmEasy यांचीच भागीदारी आहे. API Holdings ने थायरोकेयर टेक्नोलॉजीजमध्ये (Thyrocare Technologies) आपले संस्थापक ए वेलुमणी यांच्याकडून 4,546 कोटींची गुंतवणूक करत जवळपास 66.1 टक्के शेअर्स घेतले. कोणत्याही लिस्टेड कंपनीचं हे भारतातील पहिलं अधिग्रहण ठरलं.
संबंधित बातम्या
मुंबईतील पॉश एरियात 800 चौरस फुटाचं घर, केवळ 64 रुपये भाडे
NPS मध्ये FD पेक्षा दीड पट जास्त परतावा, यात गुंतवणूक करावी लागणार