आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?
आज वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत, तर काही नियमांमुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
नवी दिल्ली : Rules Change From 1st January आज वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत, तर काही नियमांमुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आजपासून नेमके कोणते नियम बदले आहेत. त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता बँकांना ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुंची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तसेच आजपासून ऑनलाईन फुड डिलेव्हरीसाठी तुम्हाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
लॉकरमधून वस्तू गाहाळ झाल्यास मिळणार नुकसान भरपाई
नव्या वर्षातील हा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल आहे. यापूर्वी जर एखाद्या ग्राहकाची वस्तू बँकेच्या लॉकरमधून चोरीला गेल्यास किंवा गाहाळ झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्राहकांची होती. संबंधित बँकेकडून ग्राहकाला कोणतीही नुकसान भरपाई मिळत नव्हती. मात्र आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमानुसार आता लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असणार आहे. लॉकरमधून एखादी वस्तू चोरीला गेल्यास ग्राहकाला संपूर्ण भरपाई मिळेल. याला अपवाद म्हणेज एखादे नैसर्गीक संकट जसे भूकंप, अतिवृष्टी, आग यामुळे जर नुकसान झाले तस संबंधित ग्राहकांना मात्र कोणतीही नुकसाई भरपाई मिळणार नाही.
एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेला लागणार अधिक शुल्क
आजपासून हा एक आणखी महत्त्वपूर्ण बदल होत आहे. प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांना फ्री ट्राझेक्शनची मर्यादा ठरून दिली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येक ट्राझेक्शनवर बँकेकडून त्यांच्या नियमाप्रमाणे चार्ज आकारला जाणार आहे. या नियमामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची अधिक शक्यता आहे.
ऑनलाई फूड डिलेव्हरी महागणार
ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपन्या असलेल्या स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांना देखील आता जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून ऑनलाईन फूड महागणार आहे. ऑनलाईन फूडची ऑडर देताना ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या
‘लिबोर’ पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज
वर्ष 2022: नियोजन हेच धोरण, तुमच्या प्रभावी ‘अर्थ’संकल्पासाठी ‘6’ मंत्र!