SIP Investment | दरमहा 10 हजार रुपयांची बचत, काही वर्षांत व्हाल श्रीमंत; ही आहे संपूर्ण योजना

SIP Investment | गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅनमध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले असते तर त्यांना 6.44 लाखांचा परतावा मिळाला असता.

SIP Investment | दरमहा 10 हजार रुपयांची बचत, काही वर्षांत व्हाल श्रीमंत; ही आहे संपूर्ण योजना
गुंतवणूकदारांना बंपर रिटर्नImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 12:45 PM

SIP Investment | गुंतवणूकदारांनी (Investors) 3 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅनमध्ये (Quant Small Cap Fund – Direct Plan) दरमहा 10,000 रुपये गुंतवले असते तर त्यांना 6.44 लाखांचा परतावा (Return) मिळाला असता. स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरते का? काय म्हणतात तज्ज्ञ ते पाहुयात..

Small Cap Fund फायद्याचा?

गुंतवणूक तज्ज्ञ नेहमीच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप फंडात (Small Cap Fund) गुंतवणुकीचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते, स्मॉल कॅप फंडांना दीर्घकालीन मध्यम व लघु मुदतीच्या योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो.

गुंतवणूकदारांना झाला फायदा

क्वांट स्मॉल कॅप फंड (डायरेक्ट प्लॅन) या अल्प मुदत म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांनी महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांना 17.52 लाख रुपयांचा परतावा मिळाला .

हे सुद्धा वाचा

फंडची सुरुवात केव्हा झाली

या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाची सुरुवात 7 जानेवारी 2013 रोजी झाली होती. या फंडने 229 टक्के सुधारित परतावा दिला आहे, तर या कालावधीत सुमारे 13.50 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

या वर्षी केले निराश

गेल्या एका वर्षात या म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना निराश केले. त्याने शून्य टक्के परतावा दिला.

बंपर रिटर्न

तर गेल्या दोन वर्षांत वार्षिक 65.6 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा आणि सुमारे 175 टक्के निव्वळ परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षात या म्युच्युअल फंडाने सुमारे 35 टक्के वार्षिक परतावा दिला आहे, तर या कालावधीत सुमारे 146.50% निव्वळ परतावा दिला आहे.

हा आहे 10 हजारांच्या गुंतवणुकीवरील परतावा

गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंडात दरमहा 10 हजार रुपयांची SIP सुरू केली असती तर आज 6 लाख 44 हजार रुपये परतावा मिळाला असता.

5 वर्षांच्या गुंतवणूकीवरील परतावा

गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅनमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर 11 लाख 71 हजार रुपयांचा परतावा मिळाला असता.

7 वर्षांतील परतावा

7 वर्षांपूर्वी या स्मॉल कॅप प्लॅनमध्ये 10 हजार रुपयांची दरमहा SIP सुरु केली असता तर 17 लाख 52 हजार रुपयांचा परतावा मिळाला असता.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.