गुंतवणुकीची हीच वेळ! ज्येष्ठ नागरीक आणि ग्राहकांची चांदी; FDवर आकर्षक व्याजदर

गुंतवणुकीत जोखीम घेऊ न शकणाऱ्या व्यक्तींसाठी एफडी नेहमीच सर्वोत्तम पर्याय ठरतो. दरम्यान,कमी व्याजदर आणि महागाईच्या वर्तमान परिस्थितीत एफडीत गुंतवणूक (INVESTMENT PLAN) तोट्याची ठरू शकते.

गुंतवणुकीची हीच वेळ! ज्येष्ठ नागरीक आणि ग्राहकांची चांदी; FDवर आकर्षक व्याजदर
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 9:01 PM

नवी दिल्ली : फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी (FIXED DEPOSIT) हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. सर्वाधिक एफडीमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. गुंतवणुकीत जोखीम घेऊ न शकणाऱ्या व्यक्तींसाठी एफडी नेहमीच सर्वोत्तम पर्याय ठरतो. दरम्यान,कमी व्याजदर आणि महागाईच्या वर्तमान परिस्थितीत एफडीत गुंतवणूक (INVESTMENT PLAN) तोट्याची ठरू शकते. मात्र, ज्येष्ठ नागरिक व जोखीम पासून सुरक्षा प्राप्त करणाऱ्या व्यक्तींसाठी एफडी सर्वोत्तम पर्याय ठरतो. सर्वसामान्य ग्राहकांसोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी (SENIOR CITIZEN) आनंदाची बातमी आहे.

एकाहून अधिक बँकांनी दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजाचा बंपर ऑफर दिली आहे. एफडीचे वाढती संख्या आणि ग्राहकांच्या विश्वासहार्यतेमुळे बँकांनी व्याज दरवाढीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांत एकाधिक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज दरवाढीची घोषणा केली आहे.

सध्या दोन कोटीहून कमी रकमेवर एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.75 टक्के व्याज अदा केले जाते. स्मॉल सेव्हिंग्स बँकांनी ग्राहकांना एफडीवर आकर्षक व्याजदर उपलब्ध करून दिले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी एफडी वरील व्याजदरांत वाढ केली आहे. सर्वसाधारण ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा एफडी निर्मितीकडे अधिक कल असतो. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बँकेत एफडी स्वरुपात ठेवतात. सर्व प्रकारच्या बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर आकर्षक व्याज देण्याचा प्रयत्न करतात.

कोणत्या बँकेचे किती व्याज?

दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवीवर ESAF स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,रेप्को बँक ज्येष्ठ नागरिकांना सात टक्के व्याजदर देतात. दोन वर्षासाठी समान रकमेच्या ठेवीवर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 7.25 टक्के व्याज अदा करतात. इंड्सइंड बँक आणि आरबीएल बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के व्याज देतात. दोन कोटीपेक्षा कमी आणि दोन वर्षापर्यंतच्या एफडीवर उत्कर्ष बँक 6.75 टक्के व्याज दर दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.25 टक्के आहे. इंड्सइंड बँक सर्वसाधारण ग्राहकांना 6.5 आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याज दिले जाते. आरबीएल बँक सर्वसाधारण एफडीवर 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के वजा प्रदान करते.

फिक्स डिपॉझिटला सुरक्षा कवच

स्मॉल फायनान्स बँक आणि खासगी बँकाद्वारे अधिक व्याज दर प्रदान केले जातात. वित्तीय संस्थामधील ठेवींवर डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे (DICGC) 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सुरक्षा कवच प्रदान केले जाते. बँकेची आर्थिक गणित बिघडल्यानंतर गुंतवणुकदारांना ठेवींची सुनिश्चिती साठी संरक्षण कवच महत्वाचे ठरते. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित डीआयसीजीसीचे संनियंत्रण केले जाते.

कामाच्या इतर बातम्या :

सोनं खरेदी करताय! त्यापूर्वी जाणून घ्या सोन्याचे दर, अंदाज बांधा आणि खरेदीला लागा!

काय सांगता! अवघ्या 5 रुपयांचा शेअर पोहचला 470 रुपयांवर, 5 महिन्यांतच एक लाखांचे झाले 94 लाख

मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.