नियमांचे उल्लंघन केल्यास ‘सोशल मीडिया इंफ्युअन्सर्स’ला बसणार दणका, कारवाई वाचून चक्रावूनच जाल!
या नियमाचे मोठे पडसाद उमटतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतातील सोशल मीडिया इंफ्युअन्सर्सचे मार्केट खूप मोठे आहे. सोशल मीडियाचे स्वरूप खूप मोठे आहे. त्यामुळे कमी फॉलोवर्स असलेल्यांना ट्रॅक करणे आव्हानात्मक असेल.
केंद्र सरकारने सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या आणि सोशल मीडियावर आपला ठसा उमटवणाऱ्या सेलिब्रिटींसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सोशल मीडिया इंफ्युअन्सर्स’साठी (social media influencers) सरकार लवकरच तपशीलवार मार्गदर्शक (Guideline) तत्त्वे जारी करणार आहे. या तरतुदींमध्ये प्रथमच नियम मोडणाऱ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचा समावेश असेल. याशिवाय नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना दंडाची रक्कम 20 ते 50 लाख रुपयांपर्यंत वाढविली जाऊ शकते. येत्या दहा दिवसांत सरकार यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
संबंधित अधिकार्यांचे म्हणणे आहे की, या नियमांनुसार सोशल मीडिया प्रभावकांना ब्रँडच्या जाहिरातीसाठी केलेल्या मानधनाबद्दल खुलासा करणे देखील बंधनकारक असेल किंवा त्यांना ते जाहिरात करत असलेल्या उत्पादन किंवा सेवेची माहिती द्यावी लागेल. कलाकारांसाठी, सरकारने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि विपणन संप्रेषणे रोखण्यासाठी कठोर तरतुदींसह जूनमध्ये असाच नियम आणला होता. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि बनावट जाहिराती रोखण्यासाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वे ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार असतील, असे सूत्रांनी सांगितले.
काय असू शकतात नियम
सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांवर खोटी पुनरावलोकने लिहिल्याबद्दल किंवा त्यांच्या चाहत्यांचा वापर करून बनावट उत्पादनांचे समर्थन करणाऱ्या कंपन्या, ब्रँड आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसह सर्व भागधारकांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे समोर आणली जाणार आहे.
15 हजार कोटींची वार्षिक उलाढाल
या नियमाचे मोठे पडसाद उमटतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतातील सोशल मीडिया इंफ्युअन्सर्सचे मार्केट खूप मोठे आहे. सोशल मीडियाचे स्वरूप खूप मोठे आहे. त्यामुळे कमी फॉलोवर्स असलेल्यांना ट्रॅक करणे आव्हानात्मक असेल. बर्याच वेळा असे दिसून येते की कमी फॉलोअर्स असलेली व्यक्ती देखील सोशल मीडियावर हिट झाल्यास व्हायरल होऊ शकते आणि मोठ्या संख्येने दर्शकांना प्रभावित करू शकते. सध्या सगळ्याच क्षेत्रात इंफ्युअन्सर्स तयार झालेले आहे. काही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी कडक नियमांची गरज आहे. एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या मते भारतात सोशल मीडिया इंफ्युअन्सर्सची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे 1500 कोटी रुपये आहे, जी दिवसोंदिवस वाढतच चालली आहे.