‘या’ राज्यात उभारले जाणार देशातील सर्वात मोठं सोलर पार्क, काय होणार फायदा?
Solar Plant | कच्छच्या वाळवंटातील नव्या सोलार पार्कमुळे स्थानिक लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या सोलर पार्कसाठी अनेक तंत्रज्ञांची गरज लागणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात.
नवी दिल्ली: एनटीपीसी रिन्यूबल एनर्जी लिमिटेडकडून गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात 4,750 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क उभारले जाणार आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हे देशातील सर्वात मोठे सोलर पार्क ठरणार आहे. भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असणाऱ्या कच्छच्या वाळवंटात उभारल्या जाणाऱ्या या सोलर पार्कमध्ये अनेक कंपन्यांना यापूर्वीच सौर आणि पवन उर्जेच्या प्रकल्पांसाठी जमिनी ताब्यात देण्यात आल्या आहेत. एनटीपीसीचा प्रकल्प खवडा आणि विघकोट या गावांच्या परिसरात असेल.
सध्या गुजरातला 18000 मेगावॅट वीज लागते. राज्यात सध्याच्या घडीला 30,500 मेगावॅट वीजेची निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. यापैकी 11,264 मेगावॅट क्षमतेचे वीजप्रकल्प हे रिन्यूबल एनर्जी प्रकारात मोडणारे आहेत. गेल्या 12 वर्षात ही क्षमता दहापटीने वाढली आहे. कच्छच्या वाळवंटातील नव्या सोलार पार्कमुळे स्थानिक लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या सोलर पार्कसाठी अनेक तंत्रज्ञांची गरज लागणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात.
घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट?
अलीकडच्या काळात कमी खर्च आणि शुद्ध उर्जेचा पर्याय म्हणून सौरउर्जेकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेकजण घरावर सोलर प्लांट (Solar Plant) लावण्याला प्राधान्य देत आहेत. तुमच्या घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल हे तुम्हाला किती वीज लागते यावर अवलंबून आहे. तुम्हाला महिन्याला वीजेचे बिल 1000 रुपये येत असेल तर 1 किलोवॅटचा प्लांट तुमच्यासाठी योग्य आहे. 10 हजार रुपये वीजेचे बील असेल तर त्या घरासाठी 10 किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल.
किती वीजेची निर्मिती होते?
10 किलोवॅट प्लांटच्या माध्यमातून महिन्याला 1200 युनिट वीजेची निर्मिती होते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरासाठी सोलर प्लांटची निवड करावी. 10 किलोवॅटच्या सोलर प्लांटसाठी तुम्हाला साधारण 4 लाख रुपये इतका खर्च येतो. तर 5 किलोवॅटच्या सौरउर्जा प्लांटसाठी 2.5 लाख रुपये इतका खर्च येतो.
अनुदान मिळते का?
सौरउर्जेचा प्लांट लावण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. केंद्र सरकार यासाठी 20 टक्के तर प्रत्येक राज्यानुसार अनुदानाचे वेगवेगळे नियम आहेत.
संबंधित बातम्या:
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना
Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?
आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च