Loan : कर्ज पण करु शकते तुमचे नुकसान, रहा सावधान! काय आहे गुड आणि बँड लोन, समजून घ्या

Loan : कर्ज काढून सण साजरे करु नये, अशी साजरी म्हण आपल्याकडे आहे. पण मोठ्या स्वप्नांसाठी कर्ज तर घ्यावेच लागते, पण सगळेच कर्ज काही काही फायदेशीर ठरत नाही, काही गोत्यात पण आणतात...

Loan : कर्ज पण करु शकते तुमचे नुकसान, रहा सावधान! काय आहे गुड आणि बँड लोन, समजून घ्या
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 11:41 AM

नवी दिल्ली : आजकल अनेक जण गरज पडली, आर्थिक चणचण भासली की लागलीच कर्ज (Loan) काढतात. सध्या तर कर्ज काढणे, कर्ज घेणे हे अगदी काही मिनिटांचा खेळ झाला आहे. अनेक कंपन्या, वित्तीय संस्था आणि बँकांनी ॲंड्राईड ॲपच्या (Android App) माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा सुरु केला आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या कर्ज घेऊ शकता. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात, तसेच कर्ज घेताना होते. गुड आणि बॅड असे कर्जाचे (Bad And Good Loan) प्रकार असतात हे तुम्हाला माहिती आहे का? कर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ झाल्याने अनेक जण कर्जाच्या नुकसानीकडे लक्ष देत नाहीत आणि कर्जाच्या गर्तेत अडकतात. अथवा मोठी परतफेड करतातत.

काय असते चांगले कर्ज? Good Loan ते असते ज्यामुळे, तुमची संपत्ती वाढते. ती कमी होत नाही. हे कर्ज वेळेनुसार, तुमची संपत्ती वाढविण्यासाठी मदत करते. यामुळे तुमचे करिअर, संपत्तीमध्ये सकारात्मक वाढ होते. ज्या कर्जामध्ये परतावा दर त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल, ते चांगले कर्ज असते. शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, गृहकर्ज हे या श्रेणीत मोडते.

वाईट कर्ज, हा काय प्रकार? बँड लोन हे ते कर्ज असते, ज्यात व्याजा व्यतिरिक्त तुम्हाला अधिक रक्कम चुकवावी लागते. या प्रकारच्या कर्जात कर्जदाराला आणि बँकेला पण कधी कधी नुकसान होते. असे कर्ज बुडण्याची भीती बँकांना अधिक असते. तर अशा कर्जामुळे व्याजासह इतर शुल्कामुळे ग्राहक हैराण होतो. या कर्जाचा व्याजदर पण अधिक असतो. वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डवरील कर्ज, एखादी महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी घेण्यात आलेले कर्ज हे या श्रेणीत मोडते.

हे सुद्धा वाचा

कर्ज घेताना या गोष्टी ठेवा लक्षात कर्ज घेताना काही गोष्टींची खूणगाठ मनाशी पक्की बांधा. तुमच्यासाठी कर्ज घेणे किती आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्याकडे इतर काय पर्याय आहेत, याचा विचार करा. तुम्ही वाटेल तितके आणि बँका देतील तितके कर्ज काढू शकता. पण ही उधारी तुम्हाला कधी ना कधी चुकती करावी लागते. नाहीतर जे काही गहाण ठेवले आहे, ते विकावं लागते. त्यावर जप्ती येते. त्यामुळे बचतीची सवय, गुंतवणुकीची सवय फायदेशीर ठरते. तुमच्या मिळकतीच्या प्रमाणात 30 ते 40 कर्ज घेणे सर्वात फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या बजेटवर विशेष फरक पडत नाही.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.