नोकरीची चिंता सोडा आणि ‘हा’ व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान, महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न
Fish Farming | अनेक राज्यांमध्ये सरकार मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देत आहे. मत्स्य उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने त्याला शेतीचा दर्जा दिला आहे. याशिवाय, राज्य सरकार मत्स्य उत्पादकांना बिनव्याजी कर्ज सुविधा देत आहे. यासोबतच सरकारकडून मच्छीमारांसाठी अनुदान आणि विमा योजनाही उपलब्ध आहे.
मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.
अशाच एका जोडधंद्यापैकी एक म्हणजे मत्स्यशेती. मत्यशेतीच्या व्यवसायात तुम्ही वर्षाला 25 हजारांची गुंतवणूक करून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता.
अनेक राज्यांमध्ये सरकार मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देत आहे. मत्स्य उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने त्याला शेतीचा दर्जा दिला आहे. याशिवाय, राज्य सरकार मत्स्य उत्पादकांना बिनव्याजी कर्ज सुविधा देत आहे. यासोबतच सरकारकडून मच्छीमारांसाठी अनुदान आणि विमा योजनाही उपलब्ध आहे.
मत्स्यशेतीमधून कशाप्रकारे कमाई होईल?
जर तुम्हीही मत्स्यपालनाच्या व्यवसायात असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्याचे आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला भरपूर नफा देऊ शकते. सध्याच्या काळात बायोफ्लोक तंत्र मत्स्यपालनासाठी खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक या तंत्राचा वापर करून लाखोंची कमाई करत आहेत.
बायोफ्लोक हे एका जीवाणूचे नाव आहे. यामध्ये मासे मोठ्या (सुमारे 10-15 हजार लिटर) टाक्यांमध्ये टाकले जातात. या टाक्यांमध्ये पाणी ओतणे, वितरीत करणे, त्यात ऑक्सिजन देणे इत्यादींची चांगली व्यवस्था आहे. बायोफ्लोक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेचे प्रथिनांमध्ये रूपांतर करतात, जे मासे परत खातात. त्यामुळे माशांच्या खाद्याच्या पैशात बचत होते. हे तंत्रज्ञान महाग असले तरी यामुळे तितकाच फायदाही मिळतो. राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळाच्या (NFDB) सल्ल्यानुसार जर तुम्हाला 7 टाक्यांसह तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यांना सेटअप करण्यासाठी तुम्हाला सुमारे 7.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. मासे मोठे झाल्यावर ते बाजारात विकून तुम्ही पैसे कमावू शकता. हा व्यवसाय मोठ्या पातळीवर गेल्यास महिन्याला 2 लाखांचे उत्पन्न मिळू शकते.
पेंग्बा मासे विक्रीतून 45 लाखांची उलाढाल
भारतातील लोकसंख्येचा एक मोठा घटक मत्स्यपालन किंवा मत्स्यव्यवसाय करतो. मत्स्यपालन हेच त्यांच्या उपजीविकेचा महत्वाचा स्तोत आहे. मत्स्यपालन करणारे काही लोक विशिष्ट प्रकारच्या माशांचे पालन करुन आर्थिक कमाई करतात. वेगळ्या प्रकारच्या माशांचे पालन केल्यानं मत्स्यपालन करणाऱ्या इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगले पैसे कमवत आहेत. पेंग्बा फिश या प्रजातीच्या माशांचं पालन करुन चांगली कमाई करता येऊ शकते.
पेंग्बा माशाला पूर्वीच्या काळी राजे आणि सम्राटांकडून मागणी होती. इतरांसाठी पेंग्बा माशाचे मत्स्यपालन करण्यास मनाई होती. आता बरेच लोक पेंग्बा प्रजातीच्या माशांचे मत्स्यपालन करतात. त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो आहे. पेंग्बा मत्स्यपालनाद्वारे अनेकांनी आर्थिक कमाई केली आहे.
मणिपूरच्या साईबम सुरचंद्रा हे पेंग्बा माशाचे पालन करतात. सुरचंद्रा हे मत्स्यपालनाद्वारे 40-45 मेट्रिक टन मासे उत्पादित करतात. या उत्पादनाद्वारे त्यांची 40-45 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. आता ते 35 हजार किलोपेक्षा जास्त माशांचं उत्पादन घेतात. सुरचंद्रा यांच्या कामाचा संपूर्ण राज्यातील मच्छीमारांना त्याचा फायदा होत आहे.
आहे.
संबंधित बातम्या:
मत्स्यपालन ठरेल आर्थिक कमाईचा राजमार्ग, पेंग्बा मासे विक्रीतून एक व्यक्ती 45 लाखांची उलाढाल करतेय
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?
मत्स्यपालनासाठी बिनव्याजी कर्ज, शेतीचा दर्जा मिळणार, ‘या’ राज्याचा मोठा निर्णय