पेट्रोल-डिझेलसाठीची पळापळ थांबवा.. लवकरच वीज, हवा, गॅसवर वाहने धावतील!
इंधनाच्या मर्यादा ओळखून भारतासह जगभरात आता पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel) पर्यायांवर काम केले जात आहे. इंधनाला अनेक पर्यायांचाही शोध घेण्यात आला आहे. परंतु अद्यापही पेट्रोल आणि डिझेला पर्याय सापडत नसल्याने त्यावरील अवलंबित्व कमी करण्यात आपणास फारसे यश आलेले नाही. पेट्रोल व डिझेलला इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजनचा पर्याय म्हणून वापर करण्यावर काम सुरु झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा (petrol-diesel) मर्यादित साठा आणि वायू प्रदूषणात (Air pollution) त्यांचा वाटा यामुळे त्यांना पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. भारतासह जगभरात यावर उपाय शोधले जात आहेत. काहींवर संशोधन सुरु झाले आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1950-51 मध्ये देशात पेट्रोलियम उत्पादनांचा वापर 3.5 लाख मेट्रिक टन होता, जो 2021-22 मध्ये वाढून 20.27 कोटी मेट्रिक टन इतका झाला. जर आपण फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या वापराबद्दल बोललो, तर 2021-22 मध्ये पेट्रोलचा वापर 308 लाख मेट्रिक टन आणि डिझेलचा वापर 766 लाख मेट्रिक टन होता. दरवर्षी सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेल वापरण्यात भारताचा अमेरिका आणि चीननंतर तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे साहजिकच भारताला पेट्रोल आणि डिझेलसाठी इतर पर्याय शोधणे आवश्यक आहे. भारत कच्च्या तेलाची (Crude oil) 85 टक्के गरज बाहेरून आयात इंधनावर भागवतो. सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबरपर्यंत क्रूड खरेदीसाठी 1.31 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
कार्बन उत्सर्जन 33 ते 35 टक्क्यांनी कमी
पेट्रोल-डिझेल सारख्या पेट्रोलियम उत्पादनांना जीवाश्म किंवा सेंद्रिय इंधन म्हणतात. त्यांना जीवाश्म इंधन असे का म्हणतात? असा प्रश्न निर्माण केला जात असतो. त्याचे कारण म्हणजे, ते वनस्पती, प्राणी आणि समुद्री जीव यांच्या अवशेषांपासून लाखो वर्षे पृथ्वीवर किंवा महासागरात दडलेले होते. परंतु त्यांच्या वापरातून ते खूप जास्त कार्बन डायऑक्साइड सोडून प्रदूषण करीत असल्याने त्यांना आता पर्याय शोधले जात आहे. भारताने 2015 मध्ये पॅरिस करारावरही स्वाक्षरी केली आहे. या कराराअंतर्गत भारताने 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 33 ते 35 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इथेनॉल आणि मिथेनॉलचा वापर
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी सांगितले होते, की 2030 पर्यंत भारतात दरवर्षी विकल्या जाणाऱ्या 30 टक़्के कार इलेक्ट्रिक असतील, तर बाईक आणि स्कूटरच्या बाबतीत ते प्रमाण 40 टक्क़े असेल. तसेच गडकरी यांनी वाहन कंपन्यांना पुढील 6 महिन्यांत फ्लेक्स फ्युएल व्हेईकल आणि फ्लेक्स फ्युएल स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकलचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले आहे. ही वाहने वेगवेगळ्या इंधनांवर चालविली जाऊ शकतात. ते पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त इतर इंधनावर देखील चालवता येतात इथेनॉल आणि मिथेनॉलपासून इंधन तयार करण्याचे काम भारतात सुरू आहे. इथेनॉल आणि मिथेनॉलचा वापर पर्यायी इंधन म्हणून केला जाऊ शकतो.
इथेनॉल
ऊस आणि मक्यापासून इथेनॉल तयार केले जाते. इथेनॉलमुळे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, तसेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल. इथेनॉल हे भारतात पेट्रोल आणि डिझेलला पर्याय बनू शकते. भारतात आपल्याकडे ऊस आणि मक्याचे उत्पादन चांगले असल्याने त्याची निर्मिती करणे सोपे असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. इथेनॉल इंधन अमेरिकेत 2001 पासून वापरात आहे. त्याची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 40 टक्के कमी आहे. भारताने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इलेक्ट्रिक
अमेरिकेसह अनेक विकसित देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण आता भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सातत्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने चालवण्याचा खर्च कमी आहे. मात्र, अशा वाहनांची किंमत जास्त आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 10.60 लाखांहून अधिक आहे. त्यापैकी बहुतांश दुचाकी आणि तीनचाकी वाहने आहेत. इलेक्ट्रिक कारची संख्या 27 हजार 930 आहे.
बायोडिझेल
बायोडिझेल हे वनस्पती तेल आणि प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले तेल आहे. बायोडिझेलची खूप कमी धूर सोडते, त्यामुळे फारसे प्रदूषण होत नाही. बायोडिझेल शुद्ध स्वरूपात किंवा डिझेलमध्ये मिसळून देखील वापरले जाऊ शकते. सरकारने लोकसभेत सांगितले होते, की सध्या डिझेलमध्ये फक्त 0.1 टक्के बायोडिझेल मिसळले जाते. सरकारने 2030 पर्यंत डिझेलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत बायोडिझेल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नैसर्गिक वायू
हे एक प्रकारचे जीवाश्म इंधन आहे, ज्यामध्ये बहुतेक मिथेन वायू असतात. हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस म्हणून वापरले जाऊ शकते. त्यांची किंमतही पेट्रोल-डिझेलपेक्षा खूपच कमी आहे. भारतात सीएनजी वाहनांचा वापर सुरू झाला आहे, परंतु एलएनजीवर काम सुरू आहे. एका अंदाजानुसार, सध्या देशात 40 लाखांहून अधिक सीएनजी वाहने आहेत.
एलपीजी
घरात स्वयंपाकासाठी वापरला जात असलेल्या गॅसला लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) असे म्हणतात. आता एलपीजी पेट्रोल-डिझेलचाही पर्याय आहे. अमेरिकेतही एलपीजीवर गाड्यांचा वापर होत आहे. मात्र, सध्या एलपीजी स्टेशनची संख्या कमी आहे. भारतातही एलपीजी वाहने वापरली जात आहेत. देशात सुमारे 25 लाख वाहने एलपीजीवर चालतात.
हायड्रोजन
हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांमध्ये हायड्रोजन फ्यूल सेल वापरल्या जातात. हे फ्यूल सेल हवेतील ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करून वीज निर्माण करतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेनंतर तयार झालेले पाणी वाहनाच्या सायलेन्सरमधून धुराऐवजी बाहेर पडतो. यामुळे अजिबात प्रदूषण होत नाही. नुकतेच नितीन गडकरी देशातील पहिली हायड्रोजन कार घेऊन संसदेत पोहोचले होते.
मिथेनॉल
इथेनॉल व्यतिरिक्त, जगभरात मिथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून वापर करण्याचे काम सुरू आहे. मिथेनॉलची खास गोष्ट म्हणजे याचा पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या बदल्यात वापर केला जाउ शकतो. हे पेट्रोल किंवा डिझेलमध्ये कमी प्रमाणात मिसळून देखील वापरले जाऊ शकते. देशात अजूनही इथेनॉल मिश्रित इंधन वापरले जात असले तरी मिथेनॉलवर काम सुरू आहे.
हेही वाचा:
Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम
Nimrat Kaur: ‘दसवी’साठी निम्रतने वाढवलं 15 किलो वजन; विनाकारण सल्ला देणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर