Income Tax : कर वाचविण्यासाठी या आहेत जोरदार सरकारी योजना, इतका वाचवाल पैसा!

Income Tax : करदात्याला जुन्या कर प्रणालीच्या आधारे कर सवलत मिळवता येईल. गुंतवणुकीवर त्याला कर वाचविता येईल. जर कर प्रणालीच्या हिशोबाने टॅक्स भरायचा असले तर तुम्हाला कमाईवर कर सवलत मिळविता येते.

Income Tax : कर वाचविण्यासाठी या आहेत जोरदार सरकारी योजना, इतका वाचवाल पैसा!
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 5:49 PM

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) दाखल करण्याची तारीख जवळ आली आहे. एप्रिल महिन्यात देशात इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. तर सध्याची जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणालीच्या हिशोबाने कर दाखल करता येतो. नवीन कर व्यवस्थेनुसार (New Tax Regime) , जर कोणी कर जमा करणार असेल तर करदात्याला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. करदात्याला जुन्या कर प्रणालीनुसार (Old Tax Regime) , कर सवलत मिळेल. करदात्याला जुन्या कर प्रणालीच्या आधारे कर सवलत मिळवता येईल. गुंतवणुकीवर त्याला कर वाचविता येईल. जर कर प्रणालीच्या हिशोबाने टॅक्स भरायचा असले तर तुम्हाला कमाईवर कर सवलत (Tax Exemption) मिळविता येते. तुम्हाला कशाप्रकारे कर सवलतीचा फायदा घेता येईल, ते पाहुयात.

कर सवलत योजना

करदात्याला जुन्या कर प्रणालीअतंर्गत कर जमा करायचा असेल तर त्याला गुंतवणुकीवर कर सवलतीचा दावा दाखल करता येईल. करदात्याला जुनी कर व्यवस्थेतून कर सवलत मिळवता येईल. सरकारच्या योजनेमध्ये गुंतवणूक करुन ही सवलत मिळवता येते. या टॅक्स सेव्हिंग स्कीम योजनेत, करपात्र कमाईवर कर सवलत मिळेल. म्हणजे करदात्याला करपात्र रक्कमेवर कर सवलत मिळेल. बचतीवर, गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळेल.

हे सुद्धा वाचा

बचत योजना

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C, 80CCC आणि 80CCD(1) च्या एक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ मिळेल. प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांचा समावेश आहे. यामध्ये जीवन विमा योजनांपासून हायब्रिड युलिप योजनांपर्यंतचा समावेश आहे. यामध्ये काही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) योजनांचाही समावेश आहे.

प्राप्तिकर योजना

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एक बचत बाँड योजना आहे. ही प्रामुख्याने छोट्या आणि मध्यम कमावत्या वर्गासाठी लागू आहे. त्यानुसार, कलम 80C अंतर्गत बचत करताना गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. जर तुमच्याकडे बँक, टपाल खात्यातील बचत खाते आहे. तर तुम्ही -ई मोडवर एनएससी प्रमाणपत्र खरेदी करता येईल. त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट बँकिंगची सुविधा आवश्यक आहे. या योजनेतून तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कर वाचवू शकता.

म्युच्युअल फंड गुंतवणूक

कर बचतीसह म्युच्युअल फंडात (Mutual Funds) जोरदार परतावा मिळवता येऊ शकतो. नवीन वर्षात गुंतवणुकीसह कर बचतीचा (Tax Saver) विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी महत्वाची आहे. 31 मार्च जवळ येत आहे. त्यामुळे अनेक करदात्यांना कर वाचविण्याची चिंता सतावत आहे. करदाते अजून गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. त्यांना परताव्यासह कर बचत ही करायची आहे. बाजारात अनेक योजना आहेत. पण अशी गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला नुसता पैशा अडकवून ठेवायचा नाही. तर त्यातून फायदाही मिळवायचा आहे. असा पर्याय तुम्हाला म्युच्युअल फंडातील इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS)मिळतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.