AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : केंद्र सरकारने केली घोषणा, ही चूक पडेल महागात! ITR अर्ज भरताना घ्या काळजी

Income Tax : केंद्र सरकारचा अलर्ट, आयटीआर भरताना घ्या काळजी, नाहीतर याा चूका पडतील महागात

Income Tax : केंद्र सरकारने केली घोषणा, ही चूक पडेल महागात! ITR अर्ज भरताना घ्या काळजी
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 8:21 PM

नवी दिल्ली : इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करणे हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य आहे. ज्याचे उत्पन्न करपात्र आहे, त्याने तर न विसरता हे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. प्राप्तिकर रिटर्न दाखल करताना करदात्यांना वेगवेगळ्या कर रचनेनुसार (Tax Slab) , कर जमा करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांना कर सवलत ही मिळते. त्यासाठी कराचे वेगवेगळे स्लॅब, रचना आहेत. परंतु, यामध्ये एक अडचण आहे, त्यांना करानुसार, वेगवेगळे अर्ज, फॉर्म (Form) भरावा लागतो. त्यामुळे हा अर्ज भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. केंद्र सरकारसह प्राप्तिकर खात्याने अर्ज भरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्राप्तिकर रिटर्न आता प्राप्तिकर विभागाने ITR-1 आणि ITR-4 फॉर्म ऑफलाईन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जांचा, फॉर्मचा उपयोग आर्थिक वर्ष (FY) 2022-23 शी संबंधित आयकर रिटर्न (ITR) दाखल करता येईल. याविषयी प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता.

नवीन कर प्रणाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी जुन्या कर प्रणालीसोबतच करदात्यांसाठी नवीन कर प्रणालीची ओळख करुन दिली. विशेष म्हणजे या नवीन कर प्रणालीत करदात्यांना 7 लाख उत्पन्नांवर छद्दाम पण देण्याची गरज नाही. पण गुंतवणुकीवरील सवलतीसाठी तुम्हाला जुन्या कर प्रणालीचा आधार घेता येईल.

हे सुद्धा वाचा

आयटीआर फॉर्म जुन्या आणि नवीन कर प्रणालीत स्विच करण्यासाठी ITR-1 आणि ITR-4 मध्ये काही बदल करण्यात आले आहे. आयटीआर दाखल करताना अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत, व्यापारात 60 लाखांहून अधिकची उलाढाल, व्यावसायिक दृष्ट्या गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाली असेल तर गेल्या आर्थिक वर्षात तुमच्याकडून टीडीएस कपात करण्यात येईल.

इकडे लक्ष द्या 50 लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न असणारे करदाते ITR-1 चा उपयोग करु शकतात. तर ITR-4 व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि व्यावसायिक कमाई करणाऱ्या संस्थांसाठी हा ITR-4 अर्ज आहे. हे फॉर्म या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयटीआर 2, आयटीआर 3, आयटीआर 5, आयटीआर 6 आणि आयटीआर 7 सोबत दाखल करता येईल. त्यामुळे आयटीआर दाखल करताना योग्य फॉर्म निवडा आणि तो जमा करा.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.