NPS Rule Change : केंद्र सरकारचे गिफ्ट! एनपीएसमध्ये खिशाला नाही बसणार झळ

NPS Rule Change : राष्ट्रीय निवृत्ती योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. यामुळे कोट्यवधी सदस्यांचा मोठा फायदा झाला. आता एनपीएसमध्ये खिशाला झळ बसणार नाही.

NPS Rule Change : केंद्र सरकारचे गिफ्ट! एनपीएसमध्ये खिशाला नाही बसणार झळ
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 7:08 PM

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (National Pension Scheme-NPS) केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. यामुळे कोट्यवधी सदस्यांचा मोठा फायदा झाला. आता एनपीएसमध्ये खिशाला झळ बसणार नाही. निवृत्ती निधी व्यवस्थापन आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) त्यासाठी पाऊल टाकलं आहे. 27 जुलै 2023 रोजी एक अधिसूचना काढली आहे. त्याचा मोठा फायदा सब्सक्राईबर्सला मिळणार आहे. देशात एनपीएसचे कोट्यवधी सदस्य आहेत. उतारवयात अनेकांना या योजनेचा मोठा फायदा होता. या योजनेतील काही नियमांची त्यांना अडचण होत होती. पण आता त्यात केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. सवलत दिली आहे. त्याचा अनेकांना मोठा फायदा होईल.

काय झाला निर्णय

राष्ट्रीय निवृत्ती योजनेतून बाहेर पडण्यासाठी नियमात बदल केला आहे. त्यासाठी अधिसूचना काढली आहे. एनपीएस सब्सक्राईबर्स पेन्शन फंडमधून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही वर्षातील योजना निवडावी लागते. त्यासाठी सब्सक्राईबर्सला आता कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

हे सुद्धा वाचा

पेन्शन स्कीम सूटसूटीत

निवृत्ती योजना सोडण्यासाठी प्रक्रिया आता सोपी झाली आहे. PFRDA ने लोकांना मोठी सुविधा दिली आहे. . PFRDA ने यासाठी नोडल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना एनपीएस ग्राहकांना गरजेच्या वेळी योग्य गुंतवणूक करण्यासाठी मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सदस्यांना मोठा दिलासा मिळेल.

नाही लागणार शुल्क

PFRDA ने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, ग्राहक कोणत्याही प्रकारची वार्षिक योजना निवडू शकतो. त्यासाठी त्याला कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. या योजनेतील सदस्य यापूर्वीच सरकारकडे कर रुपात शुल्क देत असल्याने हा निर्णय घेतल्याचे PFRDA ने स्पष्ट केले. सदस्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

विमा कंपन्यांना आदेश

विमा कंपन्यांना या विषयीचे निर्देश देण्यात आले आहे. आता विमा योजनेवर केवळ प्रीमियम घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय कोणतेही शुल्क विमा कंपन्यांना आकारता येणार नाही.

नियम काय सांगतो

  1. PFRDA च्या नियमानुसार, एनपीएसमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर त्यांना ही रक्कम काढता येईल. जमा रक्कम आणि त्यावरील व्याज यांची एकूण 5 लाख रुपयांपेक्षा कमी हवी.
  2. यापेक्षा अधिक रक्कम असेल तर 40 टक्के रक्कम पेन्शनसाठी राखीव असेल.
  3. तर 60 रक्कम एकदाच काढता येईल.
  4. वयानुसार या योजनेतही बदल होतो.
  5. त्यासाठी ग्राहकांना आता कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हे शुल्क माफ करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.