केंद्राकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये बदल; आता दोन वर्ष करावे लागणार डेटाचे जतन

केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना आता आपाल्याकडील डेटा आणि इटनेट वापराबाबतची माहिती दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावी लागणार आहे.

केंद्राकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये बदल; आता दोन वर्ष करावे लागणार डेटाचे जतन
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:13 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना आता आपाल्याकडील डेटा आणि इटनेट वापराबाबतची माहिती दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावी लागणार आहे. दूरसंचार विभागाकडून दूरसंचार कंपन्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पूर्वी हा सर्व डेटा जनत करून ठेवण्याचा कालावधी एक वर्षाचा होता. हा कालावधी वाढवण्यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले आहे. 

काय आहे नवा आदेश

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, यापुढे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या सर्व डेटा हा दोन वर्षांसाठी जतन करून ठेवावा लागणार आहे. या डेटामध्ये इंटरनेट वापराचा इतिहास, कॉल रेकॉर्ड्स, कॉल डिटेल, एक्सचेंज डिटेल सीम नंबर अशा सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. पूर्वी याची मर्यादा एक वर्ष इतकी होती. मात्र आता ती वाढून दोन वर्ष करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर जर दूरसंचार विभागाकडून कुठलेच आदेश मिळाले नाहीत तर कंपन्या आपल्याकडील डेटा हा नष्ट करू शकतात.

जनतेच्या हितासाठी नियमांमध्ये बदल

दरम्यान हे नवे बदल जनतेच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी करण्यात आल्याचा दावा देखील दूरसंचार विभागाकडून करण्यात आला आहे. कंपन्याना देण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कंपन्यांना त्यांच्याकडील सर्व माहितीचे जनत हे  आता दोन वर्षासाठी करावे लागणार आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या इंटरनेट वापराबाबतची माहिती, सर्व कॉल डिटेल्स, इंटनेट एक्सेस, व्यक्ती वापरत असलेले सर्व प्रकारच्या अ‍ॅप्लिकेशनची नोंद ठेवणे, तसेच त्याच्या वापराबाबतचे डिडेल्स बंद झालेल्या सीम सेवेबाबतची माहिती अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा डेटा स्टोर करण्याचा कालावधी वाढवल्यास सायबर गुन्हेगारीला आळा घालता येऊ शकतो, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?

सेमीकंडक्टर समस्येचा अंत ‘वेदांत’ ! साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, अनिल अग्रवाल यांची मोठी घोषणा  

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.