Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय…. जाणून घ्या ऑनलाइन फसवणुकीचे संपूर्ण सत्य

सरकारच्या नावाने आलेल्या फसव्या मेसेजपासून सावध रहा. सरकारने ऑनलाइन फसवणूकीविरोधात अलर्टच्या नावाने इशारा दिला आहे. पीआयबीच्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि सरकारचा अशा संदेशांशी काहीही संबंध नाही.

सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय.... जाणून घ्या ऑनलाइन फसवणुकीचे संपूर्ण सत्य
सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय....Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 8:04 PM

तुमच्या मोबाईलवरही असा मेसेज आला आहे का? सरकार तुमच्या बँक खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे, असे मेसेजमध्ये कुठेतरी लिहिले आहे का? ‘सरकारी योजने’ (Government scheme) अंतर्गत बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे संदेशातही लिहिलेले नाही. तुम्हाला असा कोणताही मेसेज आला असेल, तो तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये दिसत असेल, तर लगेच सावध व्हा. सरकारने या मेसेजला फेक मेसेज (Fake message) म्हटले असून यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, अशी कोणतीही योजना त्यांच्याद्वारे चालवली जात नाही ज्यामध्ये ग्राहकांच्या बँक खात्यात 2,67,000 रुपये जमा केले जात आहेत. जर तुम्हाला असा मेसेज आला तर फसवणूक (ऑनलाइन फ्रॉड) म्हणून त्यावर क्लिक करू नका आणि त्यावर विश्वास (Faith) ठेवू नका.

सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी)ने मोबाईलवर आढळलेल्या या टेक्स्ट मेसेजचे विश्लेषण केले आहे. विश्लेषणात, पीआयबीला असे आढळले की लोकांच्या मोबाईल फोनवर असे संदेश येत आहेत. हे संदेश CP BRDOTP च्या नावाने येत आहेत. हा संदेश 24 ऑगस्ट 2021 चा आहे आणि नंतरही अनेक लोकांच्या फोनवर तो प्राप्त झाला आहे. मेसेजमध्ये ग्राहकाचा खाते क्रमांक देण्यात आला असून 24 ऑगस्ट रोजी खात्यात 267000 रुपये जमा झाल्याचे लिहिले आहे. ही रक्कम ‘सरकारी योजने’ अंतर्गत दिली जात आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी, तुम्हाला संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे. पीआयबीने आपल्या फॅक्ट चेक ट्विटमध्ये या मेसेजला फेक घोषीत करीत, दुर्लक्षीत करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारच्या नावाने अशा फसव्या संदेशांपासून सावध राहा, असे पीआयबीने म्हटले आहे. सरकारने घोटाळ्याच्या अलर्टच्या नावाने इशारा दिला आहे. पीआयबीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारकडे अशी कोणतीही योजना नाही.

कोरोनाच्या उपारासाठी चार हजार

आणखी एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान रामबान सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व तरुणांना कोरोना विषाणूच्या मोफत उपचारासाठी 4000 रुपयांची मदत मिळणार असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने हा ही दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. अशा बनावट वेबसाईटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे सरकारने पीआयबीच्या माध्यमातून सांगितले आहे. प्रधानमंत्री रामबान सुरक्षा योजना नावाची कोणतीही योजना केंद्र सरकार चालवत नाही. मेसेजद्वारे फेक मेसेज पंतप्रधान रामबान योजनेंतर्गत युवक स्वत:ची नोंदणी करू शकतात असा दावा या फेक मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. नोंदणीसाठी एक लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून पुढे जाण्यास सांगितले आहे. व्हायरल मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की काही लोकांना सरकारी योजनेत 4000 रुपये मिळाले आहेत आणि तुम्हाला हवे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

सावध व्हा, तुमची दिशाभूल होतेय

लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि आर्थिक नुकसान करण्यासाठी सोशल मीडियावर लॉटरीशी संबंधित संदेश, कॉल आणि ईमेल पाठवले जात आहेत. समाजकंटाकडून आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रयत्न असून, यापासून प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. अशी कोणतीही लॉटरी जिंकण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांकडून तुम्हाला फोन कॉल, ईमेल किंवा मेसेज आल्यास ताबडतोब सावध व्हा. तुमची वैयक्तिक माहिती, बँक तपशील इत्यादी कधीही शेअर करू नका. स्पॅम किंवा अनवॅन्टेंड मेल त्वरित हटविण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांनी केले आहे.

इतर बातम्या

माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.