PF Interest: पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू, ‘असा’ तपासा तुमचा बॅलन्स

गेल्या आर्थिक वर्षातील पीएफ ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर देण्याबाबत या वर्षी मार्चमध्ये कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT), ईपीएफओची संस्था, पीएफ ठेवींवर 8.5 टक्के व्याज दर निश्चित केला होता.

PF Interest: पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू, 'असा' तपासा तुमचा बॅलन्स
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 6:19 PM

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिवाळीपूर्वी पीएफ ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. भविष्य निर्वाह निधी खाते किंवा पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक पीएफ खातेधारकांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5% व्याज आधीच मिळाले आहे. तथापि, काही लोकांना त्यांच्या खात्यात जमा केलेली व्याजाची रक्कम पाहण्यासाठी साइटवर लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने EPF सदस्यांच्या सुमारे 25 कोटी खात्यांमध्ये 8.5 टक्के पीएफ व्याजदर जमा करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ईपीएफओने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. 8.5 टक्के व्याजदराचा लाभ EPFO ​​शी संबंधित असलेल्या 25 कोटी खातेदारांना मिळणार आहे. या खातेदारांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. EPFO ने 30 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकात पीएफ खात्यांसाठी 2020-21 या वर्षासाठी व्याजदर जाहीर केला आहे.

इतके मिळतेय व्याज

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 च्या पॅरा 60(1) अंतर्गत EPF च्या प्रत्येक सदस्याच्या खात्यात 2020-21 या वर्षासाठी 8.50 टक्के दराने व्याज जमा करण्यास केंद्र सरकारच्या मंजुरीची माहिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पीएफ ठेवींवर 8.5 टक्के व्याजदर देण्याबाबत या वर्षी मार्चमध्ये कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT), ईपीएफओची संस्था, पीएफ ठेवींवर 8.5 टक्के व्याज दर निश्चित केला होता. तुमच्या खात्यात किती दराने पैसे आले आहेत, ते तपासावे लागेल. यावर अनेक उपाय आहेत, ज्याबद्दल माहिती दिली जात आहे.

शिल्लक कशी तपासायची?

पीएफची रक्कम तपासण्यासाठी ईपीएफओ सदस्यांना मिळालेल्या यूएएनमधून तपासावे लागेल. ईपीएफओ पोर्टलवर नोंदणीकृत असलेले ईपीएफ सदस्य EPFOHO UAN ENG टाईप करून 7738299899 वर एसएमएस पाठवू शकतात.

मिस कॉलद्वारे पीएफ शिल्लक तपासा

EPFO चे नोंदणीकृत वापरकर्ते 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊ शकतात त्यानंतर त्यांना पीएफ खात्यातील शिल्लक तपशीलांसह एक एसएमएस प्राप्त होईल.

EPFO वेबसाइटद्वारे पीएफ शिल्लक तपासा

1) EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या २) आता ‘आमच्या सेवा’ टॅबवर जा आणि ‘कर्मचाऱ्यांसाठी’ वर क्लिक करा. 3) नवीन पृष्ठावर ‘सदस्य पासबुक’ वर क्लिक करा. ४) तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल 5) एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, तुमचे पासबुक आणि तुमच्या कंपनीचे योगदान आणि त्यावर मिळालेले व्याज दोन्ही दाखवले जाते. लक्षात ठेवा की जर एखाद्या व्यक्तीने चार वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केले असेल तर त्यांचे चार वेगवेगळे सदस्य आयडी असतील. या सर्व आयडींद्वारे पीएफ शिल्लक तपासता येते.

उमंग अॅपद्वारे पीएफ शिल्लक तपासा

तुमचा UAN आणि OTP सह लॉग इन केल्यानंतर तुम्ही UMANG अॅपवर तुमचे PF पासबुक देखील अॅक्सेस करू शकता. (The process of depositing interest in PF accounts is underway, check your balance)

इतर बातम्या

7000 रुपयांच्या डिस्काऊंटसह OnePlus 9 खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळेतय शानदार ऑफर

गृहकर्ज घेताय ? मग अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या हफ्ते आणि व्याजाची संपूर्ण माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.