Interest Rate : रेपो रेट तर सर्वांनाच सारखा, मग बँका ग्राहकांकडून का वसूल करतात वेगवेगळे व्याज

Interest Rate : भारतीय रिझर्व्ह बँक सर्व बँकांसाठी एकच रेपो रेट लागू करते. मग बँका ग्राहकांकडून वेगवेगळे व्याज का वसूल करतात, असा लाखमोलाचा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल नाही का?

Interest Rate : रेपो रेट तर सर्वांनाच सारखा, मग बँका ग्राहकांकडून का वसूल करतात वेगवेगळे व्याज
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 6:31 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दर दोन महिन्यांनी पतधोरणाचा आढावा घेते. त्यानंतर पतधोरण समितीच्या निर्णयानंतर रेपो दराची (Repo Rate) घोषणा करण्यात येते. देशभरातील बँकांना आरबीआय एकाच रेपो दराने पैशाचा पुरवठा करते. हा रेपो दर सर्व बँकांसाठी एकसारखा असतो. तरीही बँका ग्राहकांकडून कर्जावर वेगवेगळे व्याज (Interest Rate) का वसूल करत असेल, असा लाखमोलाचा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल, नाही का? यामागील खरे कारण आहे तरी काय, बँका ग्राहकांना एकाच व्याजावर सर्व कर्जाचा पुरवठा का बरं करत नसतील?

क्रेडिट कार्डचे काय कनेक्शन तज्ज्ञांच्या मते, बँका वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज वसुली करते, यामागे क्रेडिट कार्डचे कनेक्शन आहे. व्याज दर निश्चित करण्याचे ते एक परिमाण असल्याचा दावा केल्या जातो. शिवाय बँकेकडील मुदत ठेव आणि आवर्ती ठेवींचा परिणाम पण व्याजदरांवर दिसून येतो.

रेपो दरात इतकी वाढ रिझर्व्ह बँकेने गेल्या मे महिन्यापासून यावर्षी, फेब्रुवारीपर्यंत रेपो दरात 2.50 टक्के वाढ केली आहे. तर एप्रिलच्या शेवटी पतधोरण समितीने केलेल्या शिफारशीनंतर आरबीआयने रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. सध्या आरबीआयचा रेपो दर 6.5 टक्के आहे. म्हणजे एखाद्या बँकेला आरबीआयने 100 रुपये उधार दिले असतील तर त्यावर बँकेला 6.5 रुपये व्याज द्यावे लागेल. देशभरातील सर्व बँकांना हाच व्याजदर लागू आहे. पण बँका आपल्याकडून वेगवेगळे व्याज वसूल करतात.

हे सुद्धा वाचा

हे घटक ठरवतात व्याज दर खरं म्हणजे बँका केवळ रेपो रेटवरच नाही तर त्यांच्याकडील खेळत्या भांडवलावर, रोख रक्कमेच्या आधारे व्याज दर ठरवतात. त्या बाजारात किती कर्ज वाटप करु शकतात, बँकेच्या किती ग्राहकांना कर्ज घेतले आहे, त्यांची संख्या किती आहे. ग्राहकांची मालमत्ता किती आहे. बँकांना बचत योजनांद्वारे ग्राहकांना किती व्याज देय आहे. तर ग्राहकांकडून किती व्याज वसूली बाकी आहे. बँकेकडे विविध बचत योजनांतून किती रक्कम जमा आहे. बुडीत कर्ज किती आहे अशा अनेक घटकांचा व्याज दर निश्चित करण्यासाठी वापर करण्यात येतो.

काय असतो रेपो दर आरबीआय देशातील व्यावसायिक बँकांना कर्ज पुरवठा करतात, त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दरात वाढ झाली की आरबीआय बँकांना महागडे कर्ज देते. बँका कर्जाचा बोजा ग्राहकांवर टाकते. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर व्याजदरात वाढ होते. आरबीआय महागाईत कर्ज कमी होण्यासाठी बाजारात लिक्विडिटी कमी करते. त्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येते.

रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या प्रकारात आरबीआय व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेते. म्हणजे, या बँका आरबीआयकडे पैसे ठेव ठेवतात. त्यावर आरबीआय व्याज देते. रिव्हर्स रेपो दरात गेल्या काही दिवसांपासून काहीच बदल करण्यात आलेला नाही. सध्या हा दर 3.35 टक्के आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.