Crorepati Formula : कमाई आहे कमी, तरी पण व्हा करोडपती, हा आहे फॉर्म्युला जादुई

Crorepati Formula : तुमचं वय कमी असेल आणि पगार पण कमी असेल तर अवघ्या 30-40 हजार रुपयांच्या दरमहा कमाईत सुद्धा तुम्हाला करोडपती होता येतं.

Crorepati Formula : कमाई आहे कमी, तरी पण व्हा करोडपती, हा आहे फॉर्म्युला जादुई
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 6:06 PM

नवी दिल्ली : करोडपती होण्याचे, श्रीमंत होण्याचे प्रत्येकजण स्वप्न पाहतो. पण नियोजनाअभावी फारच कमी लोक या स्वप्नाला गवसणी घालतात. काही जण आयुष्यभर कमाई करतात. बचत पण करतात. पण त्यांच्याकडे तेवढी जमापुंजी नसते. बचतीतून तुम्ही करोडपती होऊ शकत नाही, हे तर स्पष्ट आहे. मग असा कोणता जादुई फॉर्म्युला (Crorepati Formula) आहे जो तुम्हाला करोडपती करेल, मालामाल करेल? तर याचे उत्तर आहे गुंतवणूक. बचत आणि गुंतवणुकीत मोठं अंतर आहे. बचतीतून (Saving) मिळणारा परतावा हा मर्यादित आहे. तर योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक (Investment) तुम्हाला मालामाल करु शकते.

स्वप्नांचा पाठलाग अर्थतज्ज्ञांच्या मते, कमी वेतन, कमी कमाई असली तरी तुम्हाला श्रीमंत होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करता येईल. त्यासाठी गुंतवणूक तज्ज्ञांनी एक खास फॉर्म्युला दिला आहे. या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही 30-40 हजार रुपयांच्या मिळकतीत पण श्रीमंत होऊ शकता. जर तुमचे वय 25 वर्षे असेल तर आणि दरमहा तुम्ही 30-40 हजार रुपयांची कमाई करत असाल तर वयाच्या 50 व्या वर्षी तुम्हाला निवृत्ती घेता येईल. हा फॉर्म्युला इतका दमदार आहे. पण अट एकच आहे, की तुम्ही नियोजन करुन त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

हा फॉर्म्युला येईल कामी श्रीमंत होण्यासाठी 50:30:20 हा फॉर्म्युला उपयोगी पडेल. फॉर्म्युल्यानुसार, कमाईची तीन हिश्यात वाटणी होते. तुमच्या गरजा, इच्छा आणि बचत यांचा समावेश आहे. या नियमानुसार, तुमच्या कमाईचा 50 टक्के वाटा भाडे, किराणा, वाहतूक आणि इतर किरकोळ गरजा पूर्ण करण्यावर खर्च होतो. तर 30 टक्के रक्कम ही हॉटेलिंग, मनोरंजन, खरेदी यावर खर्चासाठी राखीव ठेवा. तर 20 टक्के रक्कम ही भविष्यातील आर्थिक लक्ष गाठण्यासाठी हाताशी ठेवा. ही रक्कम तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल.

हे सुद्धा वाचा

30 हजारांत इतका हिस्सा दरमहा तुम्हाला 30 हजार रुपये वेतन मिळते, असे गृहित धरले, तर 50:30:20 हा नियम तुमच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी पगार 50:30:20 या प्रमाणात वाटप करावा लागेल. पगाराचे तीन हिस्से करावे लागतील. तुमच्या पगाराचे या आधारे 15,000, 9,000 आणि 6,000 अशी विभागणी होईल.

असे व्हा करोडपती तर गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे 6,000 रुपये हाती असतील. तुम्ही योग्य म्युच्युअल फंड निवडला आणि त्यात गुंतवणूक केली तर भविष्यात मोठा फायदा होईल. म्युच्युअल फंडमध्ये 6000 रुपयांची SIP गुंतवणूक केल्यास फायदा होईल. पगार वाढला तर त्यातील काही हिस्सा पुन्हा एसआयपीद्वारे गुंतविता येईल. दरवर्षी एसआयपीत तुम्ही 20 टक्के वाढ केली. 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली, तर फायदा दिसेल. 12 टक्के हिशोबाने तुम्हाला एकूण 2,17,45,302 रुपये मिळतील. तर व्याजाच्या रुपाने 15 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 3,42,68,292 रुपये होईल. म्हणजे 20 वर्षांनंतर तुम्ही करोडपती होऊ शकता.

विशेष सूचना : याठिकाणी केलेली आकडेमोड ही केवळ अंदाजे केलेली आहे. योग्य परिणाम आणि अधिक परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.