AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saving Scheme : पोस्टाच्या या योजनेत पैसा येईल धावत, पण कोणाला करता येईल गुंतवणूक

Saving Scheme : टपाल खात्याच्या या योजनेत पैसा धावत येईल. या योजनेवर केंद्र सरकार व्याज ही चांगले देते. त्यामुळे मोठी बचत केल्यास गुंतवणूकदारांना कोणत्याही जोखीमेशिवाय चांगला परतावा मिळेल.

Saving Scheme : पोस्टाच्या या योजनेत पैसा येईल धावत, पण कोणाला करता येईल गुंतवणूक
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 5:31 PM

नवी दिल्ली : देशातील पोस्ट ऑफिसने (Post Office) आता एक नवीन बचत योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारने महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून या योजनेचा श्रीगणेशा झाला. पोस्टाच्या अनेक अल्पबचत योजना जनतेत लोकप्रिय आहे. पोस्टाच्या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकार हमी देते. या योजनेतील रक्कम डुबत नाही. अल्पबचत योजनेवर (Small Saving Scheme) चांगले व्याज मिळेत. त्यामुळे ग्राहकांची चांदी होते. चांगला परतावा मिळत असल्याने देशात मोठ्या प्रमाणावर या योजनेत गुंतवणूक होते. आता नवीन योजनेत ही 7.5% टक्के व्याज मिळते.

कोणती आहे योजना केंद्राने महिला सम्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate- MSSC) योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरु केली आहे. ही योजना केंद्रीय अर्थमंत्रालयाने सुरु केली आहे. त्यासाठी अर्थखात्याने अधिसूचना काढली आहे. ही योजना तात्काळ प्रभावाने देशातील 1.59 लाख टपाल खात्यात सुरु झाली. आता महिलांना या योजनेचा लाभ जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन घेता येईल.

7.5% व्याज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा 1 फेब्रुवारी रोजी, केंद्रीय अर्थसंकल्प, 2023-24 मध्ये केली. आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेत मुलींसह महिलांना खाते उघडता येईल. महिला सबलीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही योजना आहे. या योजनेवर 7.5% चक्रवाढ व्याज मिळते. ही योजना 31 मार्च, 2025 पर्यंत वैध आहे.

हे सुद्धा वाचा

खाते कुठे उघडाल महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना कोणतीही महिला अथवा लहान मुलीच्या नावे पालकांना सुरु करता येईल. योजनेतंर्गत 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येईल. खाते पोस्ट ऑफिस अथवा बँकेत उघडता येईल.

दोन लाख करा जमा या योजनेवर गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज मिळेल. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवता येईल. या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा करता येईल.

इतकी काढता येईल रक्कम या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येईल. गरजेच्यावेळी रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकेल. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.