आधारमध्ये या चार अपडेटसाठी सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही; घरी बसल्याच करु शकता हे काम
सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल (SSUP)च्या माध्यमातून आपण नाव, जन्म तारीख, पत्ता आणि लिंग ऑनलाईन अपडेट करू शकता यूआयडीएआयने ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. (There is no need to go to the center for these four updates in Aadhaar, you can do this at home)
नवी दिल्ली : आधार कार्ड(Aadhaar Card) आणि 12 अंकी आधार क्रमांका(Aadhaar Number)चे महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे. आधार कार्ड एक ओळख दस्तऐवज आहे. यामध्ये अगदी लहान चूक देखील आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरु शकते. रेकॉर्डमधील कोणत्याही दुरुस्तीसाठी, आधार सेवा केंद्रा(Aadhaar service centre)समोर रांगेत उभे रहावे लागते. (There is no need to go to the center for these four updates in Aadhaar, you can do this at home)
तथापि, आधारशी संबंधित अशी चार कामे आहेत की ती निकाली काढण्यासाठी आपल्याला आधार सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. आपण घरी बसून ऑनलाईन तोडगा काढू शकता. सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल (SSUP)च्या माध्यमातून आपण नाव, जन्म तारीख, पत्ता आणि लिंग ऑनलाईन अपडेट करू शकता यूआयडीएआयने ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. यूआयडीएआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुम्हाला तुमचा पत्ता आधार कार्डमध्ये बदलायचा असेल तर तुम्ही सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP)च्या माध्यमातून करू शकता. आपण प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये शुल्क घेऊन एकावेळी एकापेक्षा अधिक तपशील अपडेट करू शकता.
रजिस्टर्ड मोबाईल नंबर असावा
ही सुविधा घेण्यासाठी एखाद्याचा मोबाईल फोन नंबर आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. आपल्या नोंदणीकृत मोबाईलमध्ये आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी ओटीपी मिळेल. आधारसाठी नोंदणी करताना आपण आपला मोबाईल क्रमांक नोंदविला नसेल तर तो नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कायमस्वरुपी नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.
अन्य अपडेट्स
कुटुंबातील प्रमुख किंवा पालकाचा तपशील किंवा बायोमेट्रिक अपडेटसारख्या अन्य अपडेटसाठी आपल्याला आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी / अपडेट केंद्रास भेट द्यावी लागेल.
आवश्यक दस्तावेज
आपण आपल्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख किंवा पत्ता बदलू इच्छित असल्यास आपल्याला सत्यापनासाठी प्रत्येक दस्तऐवजाची स्कॅन केलेली प्रत सबमिट करावी लागेल, परंतु लिंग अपडेटसाठी कोणत्याही दस्तऐवजाची आवश्यकता नाही.
स्टेटस अपडेट
आपल्या आधार अपडेटची स्थिती ट्रॅक करण्यासाठी URN आणि आपला आधार क्रमांकाचा वापर https://ssup.uidai.gov.in/checkSSUPSstatus/checkupdatestatus या लिंकवर करा.
सर्विस चार्ज
ही सेवा विनामूल्य नाही. प्रत्येक अपडेट विनंतीसाठी यूआयडीएआय आपणास 50 रुपये शुल्क आकारेल. आधार कार्डधारक आपल्या आयुष्यात दोनदा नाव बदलू शकतो तर जन्म आणि जन्मतारीख आयुष्यभर एकदा बदलू शकते. (There is no need to go to the center for these four updates in Aadhaar, you can do this at home)
Indian Navy Admit Card : भारतीय नौदलात 2500 पदांसाठीच्या भरतीचं ॲडमिट कार्ड जारीhttps://t.co/t3bgDWoHjV#Navy #IndianNavy
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
इतर बातम्या
90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत
केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात; ठाण्यात शुक्रवारी ओबीसींचा आक्रोश मोर्चा