‘या’ बँका देतायेत Savings Account वर सर्वोत्तम व्याजदर; आजच आपले खाते ओपन करा
आज आपण अशा बँकांची माहिती घेणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर (Bank Savings Account) सर्वोत्तम व्याज दर देत आहेत. प्रत्येक वर्षी जवळपास सर्वच बँका या आपल्या व्याजदरात बदल करत असतात.
आज आपण अशा बँकांची माहिती घेणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर (Bank Savings Account) सर्वोत्तम व्याज दर देत आहेत. प्रत्येक वर्षी जवळपास सर्वच बँका या आपल्या व्याजदरात बदल करत असतात. कोरोनाचा मोठा फटका हा बँकिंग क्षेत्राला देखील बसला आहे. त्यामुळे अनेक बँकांनी सध्य बचत खात्यावरील व्याज दरात घट केली आहे. तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार आपल्याला कोणत्या बँकेत सर्वोत्तम व्याजदर मिळेल याचा शोध घेत असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा अनेक छोट्या बँका (Small banks) आहेत, की ज्या मोठ्या बँकांपेक्षा बचत खात्यावर चांगले व्याज देतात. या बँका बचत खात्यावर चार ते पाच टक्क्यांपर्यंत व्याज देतात. अशा बँकांमध्ये पैसे ठेवण्यात काही प्रमाणात रिस्क असू शकते, मात्र अशा बँकेतून बचत खात्यावर मिळणारा परतावा देखील अधिक असतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या बँकेमध्ये बचत खाते उघडणे (Best Online Savings Account) तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
बचत खात्यावर चांगाला व्याजदर देणाऱ्या बँका
अनेक छोट्या बँका अशा आहेत की ज्या मोठ्या खासगी तसेच सरकारी बँकांपेक्षा अधिक व्याजदर देतात. ज्यामध्ये यस बँकेचा समावेश होतो. एस बँक आपल्या ग्रहाकांना बचत खात्यावर चार ते पाच टक्के टक्के दराने वार्षिक आधारावर कर्ज देत आहे. यानंतर नंबर लागतो तो इंडंस्लॅड बँकेचा, ही बँक आपल्या ग्राहकांना वार्षिक आधारावर चार टक्के दराने व्याज देते. मात्र या बँकेत तुम्हाला तुमच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स म्हणून कमीत कमी एक लाख रुपये ठेवावेच लागतात. याचप्रमाणे आयडीएफसी बँक 3. 5 टक्के, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक 2.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
झिरो बॅलन्स खात्याची सुविधा
अॅक्सिस बँकेकडून आपल्या ग्राहकांना सध्या खास सुविधा देण्यात येत आहे. या सुविधेनुसार जो ग्राहक अॅक्सिस बँकेत आपले खाते ओपन करतो त्या ग्राहकाला बँकेकडून झिरो बॅलन्स खात्याची सुविधा मिळते. सोबतच बचत खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर 3-4 टक्के दराने व्याज मिळते. झिरो बॅलन्स खात्याची सुविधा मिळत असल्यामुळे ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहे. झिरो बॅलन्स खाते म्हणजे असे खाते असते, तुम्हाला बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तींचे सॅलरी खाते असते अशा लोकांना बँकांकडून झिरो बॅलन्सीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
संबंधित बातम्या
महागाईमुळे ‘या’ देशावर आली होती दहा लाखांची नोट छापण्याची वेळ, सध्या परिस्थिती नियंत्रणात
बीएमडब्ल्यूचं मिशन इंडिया : नवं आर्थिक वर्ष मोक्याचं, 24 नव्या गाड्याचं लाँचिंग