AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF Interest Rate : पीएफवर वाढलेल्या व्याज दराचा तुम्हाला किती होईल फायदा, हिशोब तर लावा

PF Interest Rate : पीएफवरील व्याजदरात वाढ झाली. लोकसभा आणि राज्यातील निवडणुका तोंडावर असल्याने यंदा व्याजदरात सलग होणाऱ्या कपातीला ब्रेक लागला. पण या व्याजदर वाढीचा तुम्हाला काय फायदा होणार

PF Interest Rate : पीएफवर वाढलेल्या व्याज दराचा तुम्हाला किती होईल फायदा, हिशोब तर लावा
कपाळाला हात नका मारु
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 5:35 PM

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) यंदा कर्मचाऱ्यांना निराश केले नाही.  पीएफवरील व्याजदरात (PF Interest Rate) मोठी वाढ झाली नसली तरी यंदा कपात झाली नाही, हेच सर्वात मोठे सूख आहे. लोकसभा आणि राज्यातील निवडणुका तोंडावर असल्याने यंदा व्याजदरात सलग होणाऱ्या कपातीला ब्रेक लागला. पीएफवरील कमाई मोठी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी, निवृत्तीनंतर ही मोठी रक्कम तुमच्या उपयोगी येते. गरजा जास्त आहेत. पगार कमी तरी यामध्ये एक ठराविक रक्कम जमा होते. त्यावर केंद्र सरकार (Central Government) व्याज देते. उतारवयात ही रक्कम उपयोगी ठरते.

अशी होते कपात

यासंबंधीच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनाच्या (Basic Salary) 12% आणि कंपनीचा 3.67 टक्के वाटा म्हणजे मुळ वेतनाच्या एकूण 15.67 टक्के दर महा पीएफ फंडात जमा करण्यात येतात. दरवर्षी 2.5 लाख रुपयापर्यंत रक्कम जमा होते. त्यावर कर सवलत मिळते. या फंडातून काही रक्कम विविध कारणांसाठी काढता येते. या फंडातील रक्कमेवरील व्याज बँकेतील एफडीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच कर्मचारी, निवृत्तीधारकांसाठी पीएफ रक्कम आर्थिक मदत देणारी ठरते.

हे सुद्धा वाचा

कर्मचाऱ्यांना 5.50 अब्जाचा फायदा

आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफवरील व्याजदर वाढल्याने कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून व्याजदरात सलग कपात सुरु आहे. पण यंदा या कपातीला ब्रेक लागला आहे. व्याज दरवाढ अत्यंत कमी म्हणजे 0.05% आहे. ईपीएफकडे 6 कोटी खातेदार सदस्य आहेत. त्यांचे 11 लाख कोटी रुपये जमा आहेत. 0.05 टक्के हिशोबाने खातेदारांना वाढीव व्याजदराने 5.50 अब्ज रुपये अतिरिक्त मिळतील.

वैयक्तिक किती होईल फायदा

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पीएफवरील व्याज रुपाने 90 हजार कोटी रुपये देण्यात येतील. मोठी रक्कम असल्याने त्यावर व्याजही मोठे मिळेल. पण वैयक्तिक खातेदाराला किती फायदा होईल? समजा या आर्थिक वर्षात तुमच्या पीएफ खात्यात 3 लाख रुपये जमा आहेत. त्यावर तुम्हाला 0.05% हून अधिक दराने व्याज ग्राह्य धरले तर केवळ 150 रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल. 100 रुपयांवर 0.05% व्याज म्हणजे, शंभर रुपयावर केवळ 5 पैशांची मिळकत आहे. तुमचे मुळ वेतन 15 हजार रुपये असेल तर नवीन व्याजदराच्या आधारे तुम्हाला एकूण 10 पैशांपेक्षा कमी लाभ होईल.

पीएफवरील व्याजाचे गणित

मुळ मासिक वेतन 15 हजार रुपये गृहित धरल्यास यामध्ये कर्मचाऱ्याचे योगदान 12% म्हणजे 1,800 रुपये असेल. कंपनीचे योगदान 3.67% म्हणजे 550 रुपये होईल. पीएफमध्ये दर महिन्याला 2,350 रुपये जमा होतील. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वार्षिक 8.15 टक्के व्याज देण्यात येत आहे. महिन्यासाठी हा दर 8.15/12 म्हणजे 0.68 टक्के असेल. दर महिन्याला 2,350 रुपयांवर 0.68 टक्के म्हणजे 15.98 रुपये महिन्याला व्याज जमा होईल. वार्षिक हिशोब लावल्यास तुमच्या खात्यात व्याजापोटी 191.52 रुपये जमा होतील.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.