Aadhaar Update : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अपॉईंटमेंटची ही सोपी पद्धत माहिती आहे का?

Aadhaar Update : आधार कार्ड हा एक महत्वपूर्ण दस्तावेज आहे. अनेकदा त्यातील त्रुटी दूर करावी लागते. अशावेळी अपॉईंटमेंट घेऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करु शकता.

Aadhaar Update : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अपॉईंटमेंटची ही सोपी पद्धत माहिती आहे का?
आधार कार्ड करा अपडेटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 8:18 PM

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक महत्वपूर्ण दस्तावेज आहे. अनेकदा त्यातील त्रुटी दूर करावी लागते. आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, फोटो यामध्ये बदल करणे आवश्यक असते. अशावेळी अपॉईंटमेंट (Appointment) घेऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट(Update) करु शकता.

सरकारी योजनांपासून बँकिंग कामांसाठी आधार आवश्यक आहे. पण अचानक घर बदलते. वयाची अथवा इतर माहिती चुकीची येते. त्यामुळे त्यात दुरुस्ती करणे आवश्यक असते.

आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर अगोदर तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर अपॉईंटमेंट घेता येते.

हे सुद्धा वाचा

मोबाईल नंबर, आपला ईमेल आयडी, बायोमेट्रिक किंवा फोटो इत्यादी माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. पण इतर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येते.

नवीन आधार कार्ड, पत्ता, नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, स्त्री-पुरुष अशी लिंगविषयीची माहिती, जन्मतारीख यांची माहिती आधार केंद्रावरुन अपडेट होते.

आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Get Aadhar हा पर्याय निवडा. Book An Appointment च्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, फिंगर प्रिंट, फोटो अपडेट इत्यादींसह अपॉईंटमेंट बुक करा. आधार कार्डमध्ये काय बदल करायचा आहे, याची माहिती द्या.

यानंतर, लोकेशन सेक्शनवर क्लिक करुन लोकेशन निवडा. Proceed to Book Appointment वर क्लिक करा. गरजेनुसार पर्याय निवडा.

मोबाईल क्रमांक, कॅप्चा कोड(Captcha code) ही माहिती द्या. जनरेट ओटीपीवर क्लिक करा. नोंदणीकृत क्रमांकावर मिळालेला ओटीपी द्या.

सगळी माहिती भरल्यावर आधार सेवा केंद्रावर क्लिक करा.एका अपडेटसाठी 50 रुपये याप्रमाणे शुल्क द्यावे लागेल. मग आपल्याला वेळ स्लॉट निवडावा लागेल आणि स्लॉट बुक करावा लागेल.

अपॉईंटमेंट बुक होईल आणि तुम्हाला शुल्क पावती मिळेल. यानंतर आधार सेवा केंद्राला भेट देऊन अपडेट कार्ड मिळेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.