LIC Jeevan Akshay | एलआयसीची योजनाच अशी, दरमहा 20 हजार मिळण्याची हमी, जाणून घ्या पूर्ण माहिती

LIC Jeevan Akshay | निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर करायचे, तर एलआयसीची ही योजना तुम्हाला दरमहा 20 हजार रुपये देईल. जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

LIC Jeevan Akshay | एलआयसीची योजनाच अशी, दरमहा 20 हजार मिळण्याची हमी, जाणून घ्या पूर्ण माहिती
लाभच लाभImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 6:00 AM

LIC Jeevan Akshay | भविष्य सुखकर करण्यासाठी अनेक जण धडपडतात. पण आयुष्याची संध्यकाळ आबादशीर जगण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे. उशीरा नियोजन केल्याने वाढता खर्च आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ बसत नाही आणि मग त्रागा केल्याशिवाय हाती काही उरत नाही. जर तुम्ही लवकरच रिटायरमेंटसाठी (Retirement) गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर एलआयसीची (LIC) ही योजना तुमच्यासाठी उपयोगी ठरु शकते. देशातील सर्वात मोठी आणि सरकारी मालकीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने अनेक योजना बाजारात उतरवल्या आहेत. आज निवृत्तीसाठी गुंतवणूक करणं हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. एलआयसीने एक पॉलिसी सुरू केली आहे, जीवन अक्षय (Jeevan Akshay) असे नावं असलेल्या या योजनेतंर्गत निवृत्तीनंतर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे या योजनेत एकरकमी गुंतवणूक करता येते. या पॉलिसीतील पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते.

योजनेत कर्जाची तरतूद

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडू शकता. पेन्शन व्यतिरिक्त या योजनेचे इतरही फायदे आहेत. गुंतवणूक करताच तुम्हाला पॉलिसी बाँड मिळतो, गुंतवणुकीनंतर पैशांची गरज असेल तर तीन महिन्यांच्या गुंतवणुकीनंतर कर्जासाठीही अर्ज करता येतो. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

वयाची अट

जीवन अक्षय पॉलिसी ही सिंगल प्रीमियम नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग पॉलिसी आहे, गुंतवणूकदाराला पॉलिसीमध्ये किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागतात. एक लाख रुपये एकरकमी जमा केल्यास वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. 35 ते 85 वर्षे वयोगटातील नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करता येते.

दरमहा पेन्शन मिळण्यासाठी पर्याय निवडा

या योजनेत 20,000 रुपये पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला पर्याय निवडावा लागेल. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये ग्राहकांना गुंतवणुकीचा आणि दरमहा रक्कम निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केवळ एक प्रीमियम जमा केल्यावर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळण्याचाही पर्याय आहे. दर महिन्याला पेन्शन घ्यायची असेल तर मासिक पर्याय स्वत:च निवडावा लागेल. दरमहा 20 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर या योजनेत 4 लाख 72 हजार रुपये एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल.

जीवन सरल योजना

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली होती. या पॉलिसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही एकदाच प्रीमियम भरून दरमहा निश्चित उत्पन्न(Fixed income) मिळवू शकता. ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर तुम्ही कधीही कर्ज घेऊ शकता हे आणखी एक वैशिष्ट्ये या पॉलिसीतंर्गत लाभधारकांना मिळते. ही पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येते. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेतील लाभधारकाला मासिक 12 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.