Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत व्हा कोट्याधीश, पण करावी लागेल गुंतवणूक इतकी

Post Office Scheme : तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ते पण पोस्ट ऑफिसच्या योजनेमधून. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही जोखीमेच्या योजनेत गुंतवणूक करण्याची गरज नाही. या योजनेतून तुम्ही मालामाल होऊ शकता.

Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत व्हा कोट्याधीश, पण करावी लागेल गुंतवणूक इतकी
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 8:37 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाला लखपती, कोट्याधीश होण्याचे स्वप्न असतेच. पण ते पूर्ण करण्याचे नियोजन करता यायला हवे. नाहीतर मग टायटाय फीस होऊन जाते. प्रचंड पैसा कमवायचा तर शेअर बाजाराशिवाय पर्याय नाही, असा उगा काहींचा समज आहे. पण काही सरकारी योजनाही तुम्हाला मालामाल करु शकतात. तेही कोणती ही जोखीम न घेता. पोस्ट ऑफिसची (Post Office) ही बचत योजना तुम्हाला करोडपती बनवू शकते. पब्लिक प्रोव्हिडंट फंडात (Public Provident Fund-PPF) दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जोरदार परतावा मिळतो. शिवाय तुमच्या गुंतवणुकीची हमी सरकार घेते. तुमची रक्कम सुरक्षित राहते.

व्याजदर निश्चित होतो. एक गोष्ट गाठीशी बांधा की, पीपीएफ ही काही श्रीमंत होण्याची योजना नाही. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये एका दीर्घ कालावधीसाठी निश्चित रक्कम जमा केल्यास योग्य परतावा मिळतो. या योजनेत कुठलीही जोखीम नाही. पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचे खाते उघडता येते. या योजनेवर निश्चित केलेला व्याजदर मिळतो. या योजनेवरील व्याजदर केंद्र सरकार निश्चित करते. दर तीन महिन्यांनी या व्याजदरांचा (Interest Rate) आढावा घेण्यात येतो. या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकारकडून सुरक्षेची हमी मिळते.

या योजनेची वैशिष्ट्ये काय पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदाराला अधिकचा फायदा मिळतो. या योजनेत सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. एका आर्थिक वर्षात गुंतवणूकदार या योजनेत जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतो. तर कमीत कमी 500 रुपये गुंतवू शकतो. जर तुम्हाला अधिक परतावा हवा असेल तर प्रत्येक महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

कंम्पाऊंडिगचा मोठा फायदा PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. कित्येक बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा हा दर जास्त आहे. यामध्ये कंम्पाऊंडिंगचा फायदा मिळते. या योजनेत सिंगल अकाऊंट खाते उघडण्याची सोय आहे. लहान मुलांच्या नावे पण खाते उघडता येते.

असे व्हा कोट्याधीश पोस्ट ऑफिसमधील पीपीएफ खात्यात तुम्ही दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास, 15 वर्षानंतर तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल तर या रक्कमेवर तुम्हाला 18.18 लाख रुपयांचा परतावा मिळेल. तुम्ही या योजनेत कालावधी वाढवल्यास आणि गुंतवणूक सुरु ठेवल्यास 25 वर्षानंतर तुम्हाला 1.03 कोटी रुपये मिळतील.

असा वाढवा कालावधी 15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. पीपीएफ खात्यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. पण तुम्हाला हा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढविता येतो. या योजनेतील गुंतवणूक ही कर सवलत पात्र असते. तुम्हाला कर सूट मिळविता येते. एवढंच नाही तर खात्याला एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कर्ज सुद्धा मिळविता येते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.