Post Office : योजनाच एकदम सुपरहिट! मिळेल 2 लाखांचे व्याज, इतकी करावी लागेल गुंतवणूक

Post Office : आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला कोणावर निर्भर राहायचे नसेल तर त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे मेहनतीने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या योजनेत तीन महिन्यांनी व्याजदर निश्चित होतो.

Post Office : योजनाच एकदम सुपरहिट! मिळेल 2 लाखांचे व्याज, इतकी करावी लागेल गुंतवणूक
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 6:31 PM

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : उतारवयात शरीर थकते आणि खर्च वाढतो. अशावेळी अगोदर केलेली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरु शकते. तुमचा कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा आयुष्याच्या संध्याकाळी मिळतो. काही सहकारी बँकेच्या बुडण्याच्या घटना, अनेक फसव्या गुंतवणूक योजनांपेक्षा पोस्टाची ही योजना फायदेशीर ठरते. या योजनेत गुंतवणुकीवर केंद्र सरकारची हमी तर मिळतेच पण चांगला परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत (Senior Citizen Saving Scheme) जबरदस्त परतावा मिळतो. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळते. या व्याजदरात केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्यात बदल करते. ही योजना सर्वांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत दोन लाखांचे व्याज मिळू शकते. पण त्यासाठी इतकी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

उतारवयात होईल फायदा

पोस्ट ऑफिस एससीएसएस ही योजना खास करुन जेष्ठ नागरीकांसाठी आहे. ही योजना 60 वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी आहे. ही योजना त्या लोकांसाठी, नागरिकांसाठी आहे, ज्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. या योजनेत सध्या 8.2 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्याला दर तीन महिन्याला या रक्कमेवर 10,250 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील पाच वर्षांत व्याजाची रक्कम दोन लाख रुपये होईल.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

  1. एकदाच जमा करा 5 लाख रुपये
  2. ही रक्कम पाच वर्षांसाठी जमा करा
  3. या रक्कमेवर 8.2 टक्के व्याज मिळेल
  4. मॅच्युरिटीची एकूण रक्कम 07,05,000 रुपये होईल
  5. व्याजाची रक्कम 2,05,000 रुपये असेल
  6. तिमाहीत ही रक्कम 10,250 रुपये होईल

या योजनेचा फायदा काय

  1. ही केंद्र सरकारची योजना आहे. यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. केंद्र सरकारची त्याला हमी मिळेल.
  2. आयकर खात्याच्या नियम 80C अंतर्गत गुंतवणूकीवर वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळेल.
  3. पोस्ट खात्याच्या या योजनेचे खाते देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरण करता येईल. या योजनेत दर तीन महिन्याला व्याजाची रक्कम जमा करण्यात येते.

कसे उघडाल खाते

या योजनेत कोणत्याही पोस्ट खात्यात, सरकारी वा खासगी बँकेत खाते उघडता येईल. त्यासाठी एक अर्ज भरुन जमा करावा लागेल. या अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र आणि इतर केवायसी कागदपत्रे जोडावे लागतील. या योजनेतील व्याजाची रक्कम थेट खात्यात जमा करता येईल. दर तीन महिन्याला केंद्र सरकार व्याजाचा आढाव घेईल.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.