AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : सावधान हा फंडा येईल अंगलट! फेक रेंट रिसिप्ट आणेल गोत्यात, जाऊ शकते नोकरी

Income Tax : इनकम टॅक्स वाचविण्यासाठी अनेक जण कामचलाऊपणा करतात. खोटी बिलं तयार करणे, घर भाड्याची खोटी पावती तयार करुन ती फाईल करणे असे अनेक प्रकार करतात. पण त्याचा तुम्हाला चांगलाच फटका बसू शकतो.

Income Tax : सावधान हा फंडा येईल अंगलट! फेक रेंट रिसिप्ट आणेल गोत्यात, जाऊ शकते नोकरी
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 3:42 PM

नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयटीआर फाईल (ITR Filing) करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. जर तुम्ही आयटीआर अजून भरला नसेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. अनेकदा करदाते कर वाचविण्याच्या नादात काही फंडे वापरतात. काही बनावट कागदपत्रे ते सादर करतात. यामध्ये घराच्या भाड्यासंबंधीची खोटी पावती (House Rent Receipt ) सादर करणे हा प्रकार तर सर्रास करण्यात येतो. गृहकर्जासाठीचा अधिकचा दावा, दानधर्माच्या पावत्या यांचा ते आधार घेतात. पण हा फंडा तुमच्या अंगलट येऊ शकतो. खासकरुन पगारदार, नोकरदार हे प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आहेत. त्यामुळे तुम्ही असा काही प्रकार करत असाल, अथवा करणार असाल तर आताच सावध व्हा, नाहीतर मोठा फटका बसू शकतो.

आता का वाढला धोका

पूर्वी अशा खोट्या पावत्या सहज खपून जात. पण आता प्राप्तिकर खात्याने आयटीआरच्या तपासणीसाठी सॉफ्टवेअरचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे बोगस आणि बनावट कागदपत्रे लागलीच ओळखू येतात. अशा करदात्यांना पकडणे सोपे झाले आहे.

हे सुद्धा वाचा

नोकरदारांना नोटीस

गेल्यावर्षीपासून आयकर विभाग अलर्ट मोडवर आहे. विभागाने अनेक वेतनदारांना नोटीस पाठवली आहे. कर सवलतीविषयी अथवा कर बचत करण्यासाठी त्यांनी जी कागदपत्रे दिली आहेत. त्याची मुळ प्रत मागविण्यात आल्या होत्या. ही नोटीस बोगस हाऊस रेंट रिसिप्ट, गृहकर्ज प्रकरणातील कागदपत्रे अथवा इतर कागदपत्रांची या नोटीस मार्फत मागणी करण्यात आली होती.

या नियमानुसार कारवाई

आयकर विभागाच्या नियम 133(6) अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीस अंतर्गत तुम्ही दाखल केलेल्या आयटीआरच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येते. तुमच्याकडून काही कागदपत्रांची माहिती मागविण्यात येते.

घरभाड्याचा ताप

पगारदार करदात्यांना आयकर विभागाच्या नियम 10 (13A) अंतर्गत नोटीस पाठविण्यात येते. यामध्ये घरभाडे जमा करुन कर सवलत मिळविण्यात आली असेल तर नोटीस देण्यात येते. वार्षिक एक लाख रुपयापर्यंत किराया देत असाल घरमालकाच्या पॅनकार्डची गरज नसते. त्यामुळे अनेक जण नातेवाईकांच्या नावाने बनावट घर भाड्याची पावती तयार करतात.

तर फटका

जर या नियमाचं उल्लंघन झाले तर अशा करदात्यावर आयकर खाते कारवाई करु शकते. अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्यात येते. अनेक कंपन्या अशी कारवाई गंभीरतेने घेतात. कर्मचाऱ्याला गैरवर्तुणुकीप्रकरणात नोकरी पण गमवावी लागू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अशी खोटी कागदपत्रे जोडू नका.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.