Cooler : जुना कूलर अशा पद्धतीने बनवा नवीन; जाणून घ्या टिप्स !

जर तुम्ही तुमच्या घरातील जुना झालेला कूलर फेकून द्यायच्या विचारात असाल, तर थांबा. थोडीशी मेहनत करून तुम्ही जुना कूलर नव्यासारखा बनवू शकता. जाणून घ्या काही टिप्स.

Cooler : जुना कूलर अशा पद्धतीने बनवा नवीन; जाणून घ्या टिप्स !
Cooler ServicingImage Credit source: Official Website
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 12:16 PM

गरमी आणि उकाड्यापासून वाचण्यासाठी लोकांकडून एसी (AC) आणि कूलरचा ( Cooler) खूप वापर केला जातो. जास्त वेळ एसीत राहणे हे शरीरासाठी चांगले नसते. ज्या लोकांना एसी घेणे शक्य नसते, ते कूलरचा वापर करून थंडावा मिळवतात. तर बऱ्याच घरांमध्ये पूर्वीपासूनच कूलर असतो. मात्र तो जुना झाल्यामुळे (old cooler) अनेक जण तो कूलर भंगारात काढून, त्याऐवजी नवा कूलर विकत घेण्याचा विचार करतात. किंवा तोच कूलर कसाबसा वापरून उन्हाळा सहन करतात. जर तुमचाही कूलर जुना झाल्यामुळे तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा तुम्हीही जुना कूलर भंगारात देऊ न नवा कूलर घेण्याच्या विचारात असाल, तर थांबा. नव्या कूलरसाठी अधिक पैसे खर्च करण्यापेक्षा जुनाच कूलर घरच्याघरी दुरूस्त करून ( repair old cooler at home) नव्या कूलरसारखा बनवू शकता. यामुळे कूलर फक्त नवा दिसणारच नाही, तर त्यातून छान, थंड हवाही मिळेल. आणि तुम्हाला उन्हाळा सुसह्य होऊ शकेल. जाणून घेऊया जुना कूलर नव्यासारखा बनवण्याच्या टिप्स..

कूलरमधील गवत बदला

कूलरमध्ये लावण्यात आलेल्या गवतामुळे त्यातून थंड हवा येते आणि खोली गार होते. वेळोवेळी कूलरमधील गवत बदलत राहिल्यास कूलररमधून पुन्हा थंड हवा येऊ शकेल. खरंतर त्या गवतावर धूळ, मातीचे कण चिकटून राहिल्याने हवा ब्लॉक होते आणि एक प्रकारचा दुर्गंधही येऊ लागतो. त्यामुळे कूलरमधील गवत बदलल्यास फायदा होईल आणि तुम्हाला थंड हवा मिळू शकेल.

कूलर रंगवा

जुना कूलर नवा करण्यासाठी त्याच्यावरील धूळ माती पुसा. तो स्वच्छ करा. त्यानंतर तो कूलर छानशा रंगाने रंगवा. त्यामुळे त्यांवर गंज लागणार नाही, तो मजबूत राहील आणि नव्यासारखा चमकूही लागेल.

पंख्याचे सर्व्हिसिंग

वेळोवेली कूलरच्या पंख्याचे सर्व्हिसिंग करणे खूप आवश्यक असते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कूलर वापरत नसाल तर त्याचा पुन्हा वापर करण्यापूर्वी तो एकदा नीट तपासून घ्या. आणि गरज पडल्यास त्याचे नीट सर्व्हिसिंग करा.

वॉटर पंप सर्व्हिसिंग

कूलरचा वॉटर पंप फार लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे त्यामध्ये पाणी नीट चढत नाही आणि कूलरमधून वेगवेगळ्या भागातून पाणी गळू लागते. तसेच त्यामुळे कूलरमधून नीट, थंड हवाही येत नाही. अशावेळी तुम्ही एमसीलच्या मदतीने पाण्याची गळती रोखू शकता.

हवा खेळती रहावी यासाठी जागा ठेवावी

खोलीत कूलर ठेवताना अशा जागी ठेवा, जिथे नीट व्हेंटिलेशन होईल, म्हणजे हवा खेळती राहील. असे झाले नाही तर कूलरमधून थंड हवा येणार नाही आणि त्या खोलीत आर्द्रता येईल. खिडकीच्या बाहेर कूलर ठेवताना, तो उन्हात राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.