Today, gold-silver prices : चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव
आज चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. जाणून घेऊयात आजचे सोन्या-चांदीचे दर
मुंबई : आज चांदीच्या दरात (silver prices) घसरण झाली असून, सोन्याचे दर स्थिर आहेत. रविवारी चांदीचे भाव प्रति किलो 62 हजार रुपये एवढे होते. तर आज चांदीचे दर 61 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ आज चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज 22 कॅरट सोन्याचे दर (gold prices) प्रति तोळा 48360 रुपये इतके आहेत. रविवारी देखील 22 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 48360 रुपये इतके होते. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर आज 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52760 रुपये इतका आहे. 24 कॅरट सोन्याच्या दरात देखील आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान सध्या महागाई वाढत असल्यामुळे महागाई नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यात आरबीआयच्या वतीने रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट वाढल्याचा परिणाम हा सोन्याच्या भावावर दिसत असून, सध्या सोन्याचे दर स्थिर आहेत. मात्र पुढील काळात सोन्याच्या दरात काहीशी तेजी पहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर
आज राज्यात सोन्याचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,360 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52760 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,410 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,810 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,410 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,810 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,410 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,810 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48370 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52790 रुपये इतका आहे.
प्रमुख महानगरातील भाव
आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48360 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,760 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48360 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,760 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48360 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,760 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये सर्वात महाग सोने मिळत असून, 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48430 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52830 रुपये एवढा आहे. आज चांदी किलोमागे 500 रुपयांनी स्वस्त झाली असून, चांदीचा भाव प्रति किलो 61 हजार 500 रुपये एवढा आहे.