Today gold-silver rate : सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे भाव
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Today gold-silver rate) सातत्याने घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज देखील सोन्याच्या (gold) दरात प्रति तोळ्यामागे किंचित घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48440 रुपये आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Today gold-silver rate) सातत्याने घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज देखील सोन्याच्या (gold) दरात प्रति तोळ्यामागे किंचित घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48440 रुपये आहेत. ते मंगळवारी 48450 रुपये इतके होते. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात तोळ्यामागे केवळ दहा रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53240 रुपये एवढा आहे. चांदीच्या (silver) दरात देखील घसरण होत असून, चांदीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात कमी झाल्याचे पहायला मिळत आहेत. बुधवारी चांदीचा दर प्रति किलो 65 हजार 500 रुपये एवढा आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच जाहीर होतात. तर दुसऱ्यांदा सायंकाळी पाच नंतर जाहीर केले जातात. सोन्याचा भाव हा सोन्याचा दर अधिक दागिन्याच्या घडणावळीचा खर्च असा ठरत असल्यामुळे अनेक ठिकाणी सोन्याच्या दरात तफावर आढळून येते.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 440 रुपये आहे. तर 24 कॅरटचा दर 53240 रुपये प्रति तोळा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 490 रुपये इतका असून, 24 कॅरटचा दर प्रति तोळा 52 हजार 900 रुपये इतका आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 490 रुपये इतका आहे, तर 24 कॅरट प्रति तोळा सोन्यासाठी 52 हजार 900 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो 65 हजार 500 रुपये एवढा आहे.
सोन्याच्या मागणीत वाढ
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र आश्चर्य म्हणजे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन देखील सोन्याचे दर घसरत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54 हजारांवर पोहोचले होते. मात्र चालू आठवड्यात जवळपास एक हाजरांपेक्षा जास्त घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. चालू आठवड्यामधे सोन्याचे दर प्रति तोळा 53 हजारांपर्यंत खाली आले आहेत.