आज आयटीआर दाखल करण्याचा शेवटचा दिवस; …तर मध्यरात्रीपासून भरावा लागणार पाच हजारांचा दंड
आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तसेच आर्थिक वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचा देखील आज शेवटचा दिवस आहे. करदात्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येणार आहे. त्यानंतर मात्र 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तसेच आर्थिक वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचा देखील आज शेवटचा दिवस आहे. करदात्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येणार आहे. त्यानंतर मात्र 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी दंडाची रक्कम दहा हजार रुपये होती. मात्र 2020-21 वर्षासाठी त्यामध्ये कपात करून ती पाच हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ज्यांचे वार्षीक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, अशा सर्वांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणे आवशक असते.
दोनदा मुदत वाढ
करदात्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 31 मार्च 2022 पर्यंत आयटीआर दाखल करताय येणार आहे. मात्र आज 12 नंतर जे करदाते आयटीआर दाखल करतील त्यांच्याकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या आर्थिक वर्षाचा आयटीआर दाखल करण्यासाठी दोनदा मुदत वाढवण्यात आली होती. साधारणपणे जुलैपर्यंत आयटीआर दाखल करता येतो. मात्र कोरोनामुळे पहिल्यावेळेस 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यामध्ये पुन्हा वाढ करून ती 31 डिसेंबर करण्यात आली. आज आयटीआर भरण्याची मुदत संपत आहे. रात्री बारानंतर आयटीआर भरणाऱ्या करदात्यांकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे
जर तुम्हाला एखाद्या बँकेतून लोन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे आयटीआर मागितला जातो, हा आयटीआर तुमच्या कमाईचा पुरावा असतो. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याचा अंदाज बँकांना येतो आणि त्याच आधारावर तुमच्या लोनची रक्कम ठरवली जाते. तुम्ही जर नियमीतपणे आयटीआर भरत असाल तर तुम्हाला कुठल्याही बँकेकडून सहज लोन मिळू शकते. तसेच तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीची रक्कम वाढवायची असेल तर तुमच्याकडे आयटीआरची मागणी होते. समजा तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीचे कव्हर एक कोटीपर्यंत वाढवायचे आहे, तर अशा स्थितीमध्ये विमा अधिकारी तुमच्याकडे आयटीआरची मागणी करतात. यामधून तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत काय काय आहेत? तुम्ही विम्याची रक्कम भरण्यासाठी सक्षम आहात का हे पाहीले जाते.
संबंधित बातम्या
EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया
नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ