Today’s gold-silver prices : आज पुन्हा सोने स्वस्त; जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या -चांदीचे भाव

आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यात होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूक वाढताना दिसत आहे.

Today's gold-silver prices : आज पुन्हा सोने स्वस्त; जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या -चांदीचे भाव
आजचे सोन्या-चांदीचे दर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 1:06 PM

मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात (gold prices) घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत होती. मात्र आज सोन्याचे दर घसरले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 46,450 इतका आहे. तर 24 कॅरट (24carats) सोन्याचा दर प्रति तोळा 50,670 इतका आहे. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचा दर 47,200 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरट सोन्याचा दरात प्रति तोळा 750 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 820 रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,490 रुपये इतके होते. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,450 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर 50,670 इतका आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,450 असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,670 रुपये इतका आहे. सोन्याचे दर दिवसांतून दोनदा बदलतात. त्यामुळे अनेकदा सोन्याच्या दरात तफावत आढळून येते. आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 58,700 रुपयांवर पोहोचले आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

  1. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून, मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,450 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,670 रुपये आहेत.
  2. पुण्यामध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,480 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,700 रुपये इतके आहेत.
  3. उपराजधानी नागपूरमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा अनुक्रमे 46,480 आणि 50,670 रुपये इतके आहेत
  4. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46500 इतका असून, 24 कॅरट सोन्यााच दर 50800 रुपये इतका आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. तर आज चांदीचा दर प्रति किलो 58,700 रुपये इतका आहे, चांदीच्या दरात आज जवळपास 2,100 रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी एक किलो चांदीचा दर 60,800 इतका होता.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.