Insurance : सोनेरी भविष्य सोडा, तोट्यात नेईल हा Insurance चा सौदा! जाणून घ्या गुंतवणुकीचा योग्य पर्याय

Insurance : विमा आणि गुंतवणुकीचा गोंधळ अनेकांना कळत नाही. त्यामुळे भविष्यातील आरामदायी आयुष्याच्या स्वप्नांना मोठा सुरुंग लागतो. तर यातील पुसट रेष जर तुम्ही ओळखली तर मोठ्या नुकसानीपासून तुम्ही वाचू शकता...

Insurance : सोनेरी भविष्य सोडा, तोट्यात नेईल हा Insurance चा सौदा! जाणून घ्या गुंतवणुकीचा योग्य पर्याय
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 11:25 AM

नवी दिल्ली : विमा (Insurance) आणि गुंतवणुकीचा गोंधळ अनेकांना कळत नाही. त्यामुळे भविष्यातील आरामदायी आयुष्याच्या स्वप्नांना मोठा सुरुंग लागतो. अनेक जण विमा कंपन्यांच्या फसव्या जाहिरातीला भुलतात. विमा आणि गुंतवणुकीचा प्लॅन एकत्रच खरेदी करतात. त्यातून भविष्यात त्यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळू शकतो. मात्र गुंतवणुकीतून (Investment) हवा तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे गुंतवणूक आणि विमा या दोन भिन्न बाबी आहेत, हे समजून घेतले पाहिजे. ही पुसट रेष जर तुम्ही ओळखली तर मोठ्या नुकसानीपासून तुम्ही वाचू शकता…

तर असा होतो तोटा एखाद्या विमा कंपनीच्या विमा पॉलिसीचं एक उदाहरण पाहू. यामध्ये कंपनीने 2 लाख रुपयांची विमा पॉलिसी विक्री केली. त्यात वार्षिक प्रीमियम जवळपास 12 हजार रुपये ठरला. विमाधारकाला 20 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर 5 लाख रुपयांचा फायदा होणार होता. तसेच त्याला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार होते. विमाधारकाला हा फायद्याचा सौदा वाटत असला तरी, यातील गोम अनेकांना कळत नाही. त्याचे विमा संरक्षण अवघे पाच लाख आणि 20 वर्षांनंतरचा फायदाही पाच लाख रुपयेच म्हणजे अत्यंत कमी आहे.

कम्पाऊंडिंगचे शास्त्र आता अनेक कंपन्या टर्म इन्शुरन्स देतात. वार्षिक प्रीमिअम पम कमी असतो. त्यात तुम्ही तरुणपणीच टर्म इन्शुरन्स काढला तर सर्वाधिक फायदा होतो. हप्ता ही कमी येतो. त्यासोबतच आरोग्य विमा काढल्यास, त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक तक्रारीचा निपटारा तर होतोच आणि खिशाला मोठी झळ बसत नाही. तसेच एफडी पेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा फायदा होतो. दर महिन्याला 4 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास आणि त्यात दरवर्षी 10% टक्क्यांची वाढ केल्यास तुम्हाला मोठा फायदा होतो. या सूत्राने दीर्घकालावधीनंतर तुम्हाला 33 लाख रुपये मिळतात. हे कम्पाऊंडिंगचे शास्त्र आहे, ते समजून घ्या.

हे सुद्धा वाचा

सातत्याचा फायदा दरमहा एसआयपीच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक केली तर करोडपती होता येते. त्यासाठी नियमीत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षाला 12 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक सातत्याने 20 वर्षे सुरु ठेवली तर एकूण 2,40,000 रुपये गुंतवणूक होईल. त्यावर 12 टक्के व्याज दर गृहित धरला तर त्यावर 7,59,148 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील 20 वर्षांत एकूण 9,99,148 रुपये म्हणजेच 10 लाख रुपये मिळतील.

या म्युच्युअल फंडाने 14 टक्के दराने परतावा दिला तर म्यॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला 13,16,346 रुपये मिळतील. 15 टक्क्यांच्या हिशोबाने म्यॅच्युरिटीवर 15,15,955 रुपये मिळतील. SIP च्या माध्यमातून 1000 रुपयांची मासिक गुंतवणूक करुन तुम्ही 20 वर्षांत कमीत कमी 10 लाख अथवा त्यापेक्षा अधिकचा परतावा मिळू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.