तब्बल 10 लाख रुपये खर्च करून बांधलेलं टॉयलेट! अधिकारीच सांगतील तुम्हाला, हे कसं घडलं…
या टॉयलेटची रचना पाहून सोशल मीडिया यूजर्सचं हसणं थांबत नाहीये.
उत्तर प्रदेश: जगभरात अशा अनेक ॲडव्हेंचर्सचा समावेश आहे, ज्यांचा समावेश सोशल मीडियाच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये होतो. कधी कुणीतरी काहीतरी कलाकारी करतं तर कधी कुणी कुणाचं अजब कृत्य लोकांचं लक्ष वेधून घेतं. अशीच एक बातमी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून आलीये. इथे कारागिरांनी एक शौचालय बांधले जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या टॉयलेटचा फोटो पाहून लोक सोशल मीडियावर खूप हसत आहेत. या विचित्र शौचालयाकडे पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.
शासनाकडून गरजू कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी मदतही देण्यात आली, मात्र उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील गौरा धुंगा गावात कारागिरांनी असे शौचालय बांधले की ज्याचा कुणी स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही.
या टॉयलेटची रचना पाहून सोशल मीडिया यूजर्सचं हसणं थांबत नाहीये. कारागिरांनी एकाच टॉयलेटमध्ये दोन सीट बसवल्या असून त्यांच्यामध्ये भिंत नाही.
शौचालय बांधल्यानंतर काही वेळातच त्याची सीट टाइल्सपासून वेगळी झाली. या विचित्र शौचालयाचा दरवाजाही गायब आहे. त्याच्या बांधकामाचा खर्च ऐकून तर लोकांचा प्रचंड गोंधळ उडाला, हसावं की रडावं अशी अवस्था झाली. हे शौचालय तयार करण्यासाठी १० लाख रुपये खर्च आला यावर विश्वास ठेवणे सोपे नव्हते.
दारांशिवाय हे सार्वजनिक शौचालय बांधणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाने जाब विचारला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी नम्रता शरण यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी प्रियंका निरंजन यांनी सांगितले.