मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडून आता विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांचे धडे; पहिल्या टप्प्यत 100 शिक्षकांना प्रशिक्षण
पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) विद्यार्थ्यांना आता मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडून (Mumbai Stock Exchange) अर्थ साक्षर करण्यात येणार आहे. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास उपक्रम राबवण्यात येणार आहे.
मुंबई : पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) विद्यार्थ्यांना आता मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडून (Mumbai Stock Exchange) अर्थ साक्षर करण्यात येणार आहे. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 100 शिक्षकांना (teachers) आवश्यक असणारे प्रशिक्षण मुंबई स्टॅक्स एक्स्चेंजच्या इन्स्टिट्यूटकडून दिले जाणार आहे. शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी याबाबत माहिती दिली. पालिकेच्या शाळांत वेगवेगळ्या आठ माध्यमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मोफत शिक्षणासह पालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. मोफत वस्तूंसोबतच बेस्ट बसमधून प्रवास, व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब अशा विविध सुविधाही विद्यार्थ्यांना पुरविल्या जात आहेत. शाळेकडून पुरवविण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबई महापालिकेंच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 26 हजारांनी वाढली आहे. सध्या स्थितीत एकूण विद्यार्थी संख्या जवळपास तीन हजारांच्या आसपास आहे.
100 शिक्षकांना प्रशिक्षण
पालिका शाळांमधील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना स्टॉक एक्स्चेंजकडून आर्थिक व्यवहारांचे धडे मिळणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळेत आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या 100 शिक्षकांना सुरुवातीच्या टप्प्यात प्रशिक्षित केले जाणार आहे. हे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतील. या अभ्यासक्रमामध्ये पैशांचे महत्त्व, पैशांची बचत कशी करावी, गुंतवणुकीचे मार्ग, बँक म्हणजे काय? बँकेची कार्यपद्धती, रिझर्व्ह बँकेची कार्यपद्धती अशा विविध विषयांचा समावेश आहे.
अभ्यासक्रमाचा फायदा
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक ज्ञानात भर पडणार आहे. विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कसे चालतात. बँकेची कार्यपद्धत नेमकी कशी असते. पैसे बचत कसे करावे, सोबतच जो पैसा बचत केला आहे तो कुठे गुंतवावा याबद्दल थोडक्यात माहिती मिळू शकेल. थोडक्यात काय तर विद्यार्थी या उपक्रमामुळे आर्थसाक्षर बनतील.
संबंधित बातम्या
CNG आजपासून 6 रुपयांनी स्वस्त! नेमकी आता किती झाली CNGची किंमत? जाणून घ्या
अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल
…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट