Indian Railway : मजेत करा प्रवास! YATRI हजर मदतीला

Indian Railway : भारतीय रेल्वेने YATRI App ची सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा दावा करण्यात येत आहे. त्याचा प्रवाशांना मोठा फायदा होईल. कसे उपयोगी येईल हे YATRI App...

Indian Railway : मजेत करा प्रवास! YATRI हजर मदतीला
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 7:09 PM

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक सोयी-सुविधा सुरु केल्या आहेत. त्यात तिकीट बुकिंगपासून ते आधुनिक रेल्वेचा सुरुवात, आधुनिक रेल्वे स्टेशनपासून स्वस्तात भोजनसारख्या अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. अशातच मध्ये रेल्वेने सुरु केलेले यात्री ॲप ( YATRI App) अनेकांना फायद्याचे ठरले आहे. अनेक प्रवाशांनी या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. हे पहिले अधिकृत लोकल रेल्वे मोबाईल ॲप आहे. लोकल ट्रेनसंबंधीची इत्यंभूत माहिती या प्लॅटफॉर्मवर अपडेट मिळते. तसेच लोकलची वेळ आणि इतर सुविधा पण अपडेट असतात.

YATRI चा फायदा काय

सेंट्रल रेल्वेमुळे हे ॲप मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी महत्वाचे ठरले आहे. मुसळधार पावसात मुंबईकरांना लोकलची वेळ पाहण्यासाठी हा विश्वासू प्लॅटफॉर्म आहे. कोणती लोकल उशीरा धावत आहे. कोणती ट्रेन रद्द झाली आहे. कुठे पाणी साचलं आहे का, याची वेळोवेळी अपडेट यावर मिळते. मुंबईत रोजची धावाधाव करणाऱ्या प्रवाशांना ही माहिती महत्वाची ठरत आहे.

हे सुद्धा वाचा

ॲप कसे करते काम?

प्रवाशांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सेंट्रल रेल्वेने ‘YATRI App’ आणले आहे. त्याआधारे तुम्ही रेल्वे स्टेशनवर गर्दीपासून वाचू शकता. या ॲपच्या मदतीने रेल्वेसंबंधीच्या बातम्या, सूचना, निर्णय याविषयी थेट माहिती प्रवाशांच्या हातात असते. रेल्वे नियंत्रण कक्ष ही माहिती एकत्रित करुन ॲपवर देते, त्यामुळे ती विश्वसनीय असते.

ॲप असे करा डाऊनलोड

झोनल रेल्वेने प्रवाशांना मोबाईल फोनवर पावसाळ्यातील सेवेतील अडचणी जाणून घेण्यासाठी YATRI ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रवाशांना Google Play Store वा Apple ॲप स्टोअर वर जाऊन “YATRI – आपका रेलवे साथी” सर्च करावे लागेल. त्याठिकाणी ते डाऊनलोड करता येईल.

स्वस्तात जेवण

प्रवाशांना अवघ्या 20 रुपयांमध्ये पोटभरुन जेवण करता येईल. रेल्वे विभागाने देशातील 51 रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरु केली आहे. इतर स्टेशनवर लवकरच ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जेवणाचे हे स्टॉल रेल्वे स्टेशनवर असतील. जनरल डब्बे ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर थांबतात. त्याच्या अगदी समोरच जेवणाचा हा स्टॉल असेल.

काय आहे मेनू

IRCTC च्या किचन युनिट्सकडून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. अगदी स्वस्तात प्रवाशांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. 20 रुपयांमध्ये प्रवाशांना 7 पुऱ्या, बटाट्याची कोरडी भाजी आणि लोणचं मिळेल.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.