Twitter : ट्विटर टिकच्या भाळी निळा टिळा नाही, तर आता हा रंग असेल ऑफिशियल..
Twitter : ट्विटर टिकचा रंग आता बदलणार आहे. ब्लू टिकच्या ऐवजी हा असेल टिकचा ऑफिशियल रंग..
नवी दिल्ली : एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटरवर (Twitter) मांड ठोकल्यावर अनेक बदल झपाट्याने घडत घडले आणि घडत आहेत. त्यात ब्लू टिकसाठी (Blue Tick) पैसे मोजावे लागणार आहे. एवढेच नाही तर युझर्सला (Users) ही ट्विटर वापरासाठी शुल्क अदा करावे लागण्याची शक्यता आहे. ब्लू टिकसाठी वापरकर्त्याला दरमहा 8 डॉलर म्हणजे जवळपास 650 रुपये मोजावे लागणार आहे. इतर ही अनेक बदल येत्या काळात दिसून येतील..
अर्थात ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना लागलीच 650 रुपये मोजावे लागणार नाहीत. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार असल्याने सध्या हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे युझर्सला सध्या 8 डॉलर मोजण्याची गरज नाही.
दरम्यान ब्लू टिकवरुन वातावरण गरम झाले असताना आणि शुल्क आकारत असल्याने मस्क यांच्यावर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त टीका सुरु आहे. पण त्याचा मस्क यांच्या धोरणावर शुन्य परिणाम झाला आहे.
तर ब्लू टिकसंबंधी प्रॉडक्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे निदेशक एस्थर क्रॉफर्ड यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यांनी एक स्क्रीनशॉट टाकला आहे. त्यात ट्विटरचा ऑफिशियल अकाऊंट आता ब्लू म्हणजे निळ्या रंगाचे नसेल.
A lot of folks have asked about how you’ll be able to distinguish between @TwitterBlue subscribers with blue checkmarks and accounts that are verified as official, which is why we’re introducing the “Official” label to select accounts when we launch. pic.twitter.com/0p2Ae5nWpO
— Esther Crawford ✨ (@esthercrawford) November 8, 2022
एस्थर क्रॉफर्ड यांनी टाकलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ट्विटरचे ऑफिशियल अकाऊंटच्या टिकचा रंग ग्रे दिसत आहे. या करड्या रंगासोबतच स्क्रीनशॉटमध्ये नियमीत ब्लू चेकमार्क ही दिसत आहेत.
क्रॉफर्ड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये या ग्रे रंगाविषयीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, ग्रे टिक ट्विटरच्या यापूर्वीच्या व्हेरिफाईट अकाऊंट साठी नाही. युझर्स हे ग्रे टिक खरेदी करु शकणार नाहीत.
हे ग्रे टिक सराकारी अकाऊंट्स, कर्मशियल कंपन्या, बिझनेस पार्टनर्स, प्रमुख मीडिया आऊटलेट, प्रकाशक आणि काही विख्यात, प्रसिद्ध लोकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
क्रॉफर्ड यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, ब्लू टिक व्हेरिफाईड अकाऊंटची ओळख नसणार. काही खास युझर्ससाठी ब्लू टिक देण्यात येणार आहे. त्यापोटी अर्थात शुल्क अदा करावे लागणार आहे. ब्लू टिकऐवजी ग्रे टिकची माहिती ट्विटरच्या अधिकृत पेजवर उपलब्ध नाही.