Baal Aadhaar Card : बाल आधार कार्डबाबत मोठी अपडेट, आता हे काम करणे अत्यावश्यक, शुल्काबाबतही झाला हा निर्णय

Baal Aadhaar Card : बाल आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली आहे..

Baal Aadhaar Card : बाल आधार कार्डबाबत मोठी अपडेट, आता हे काम करणे अत्यावश्यक, शुल्काबाबतही झाला हा निर्णय
आधार कार्डमध्ये करा हा बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 5:21 PM

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नुकतीच बालकांच्या आधार कार्डविषयी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बाल आधार कार्डात (Baal Aadhaar Card) काही माहिती अद्ययावत करणे त्यामुळे अनिवार्य करण्यात आले आहे. आधार कार्ड अनेक ठिकाणी महत्वाचा दस्तावेज म्हणून वापरण्यात येतो. त्यामुळे हा बदल करणे सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे.

UIDAI ने याविषयीच्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी केल्या आहेत. त्यानुसार,5 आणि 15 वर्षांच्या मुलांच्या बाल आधार कार्डमध्ये बायोमॅट्रिक (Biometric) माहिती अद्ययावत (Update) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

प्राधिकरणाने याविषयीचे एक ट्विट (UIDAI Tweet) करुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार, 5-15 वर्षातील मुलांचे बायोमॅट्रिक तपशील अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ट्विट करुन प्राधिकरणाने यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. ही माहिती अद्ययावत करण्यासाठी प्राधिकरणाने कोणतेही शुल्क ठेवले नाही. निःशुल्कपणे पालकांना बायोमॅट्रिक माहिती अपडेट करता येणार आहे.

ही माहिती अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कुठलाही बदल होणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. बालकांचे बायोमॅट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर पालकांना जावे लागेल.

बाल आधार कार्डासाठी ऑनलाईन प्रक्रिया करता येते. प्राधिकरणाच्या अधिकृत uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोंदणीचा पर्याय उपलब्ध होतो.

नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यावर पालकांना बालकाचे नाव, पालकाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि इतर बायोमॅट्रिक माहिती जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्यानंतर घराचा पत्ता, राज्य आणि इतर माहिती तपशीलवार भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला अपाईंटमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

नोंदणीनंतर एक अॅक्नॉलिजमेंट क्रमांक मिळेल. त्याआधारे तुमच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती घेता येईल. त्यानंतर आधार कार्ड 60 दिवसांच्या आत नोंदणीकर्त्याच्या पत्त्यावर पाठविण्यात येईल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.