UIDAI: आधारकडून आलेला हा मेसेज फेक नाही, तुम्हाला देखील आला असेल तर लगेच करा ‘हे’ काम

आधार संबंधित एखादा मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता तपासून पहा. तो महत्त्वाचा मेसेज असू शकतो.

UIDAI: आधारकडून आलेला हा मेसेज फेक नाही, तुम्हाला देखील आला असेल तर लगेच करा 'हे' काम
आधार कार्ड Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 5:53 PM

मुंबई, आधार कार्ड म्हणजे आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज. आज बँकेत खाते उघडायचे असो की कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यायचा. सगळीकडे त्याची गरज आहे. अनेकदा आधारशी संबंधित फेक म्हणजेच खोटे मेसेज पाठवले जातात. याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देण्यात येतो. आता मात्र आधारशी संबंधित अत्यंत महत्वाचा मेसेज सरकारकडून पाठविण्यात येत आहे.  जर तुम्हालाही आधार कार्ड उपडेट करा (Update Aadhar Card) असा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता मार्गदर्शक तत्त्वांचे नक्की पालन करा.

काय आहे UIDAI चा मेसेज?

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अशा आधार कार्ड धारकांना, ज्यांचे कार्ड 10 वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्यासाठी संदेश पाठवत आहे. मेसेजमध्ये आधार कार्डच्या वैधतेच्या शेवटच्या तारखेचा संदर्भ देत असे म्हटले जात आहे की, ‘कृपया तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक्स तपशील त्वरित अपडेट करा. हे कोणतेही शुल्क न घेता करता येते. हा संदेश काहीसा अशा प्रकारचा आहे.

हे सुद्धा वाचा

अपडेट करणे का आवश्यक आहे?

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच जारी केलेल्या त्यांच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आधार अपडेट केल्यानंतर वापरकर्त्यांशी संबंधित अचूक माहिती सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये उपलब्ध होईल. आधार कार्डधारक ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याद्वारे त्यांचे आधार कार्ड नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी अद्यतनित करू शकतात. तपशिल अद्ययावत करण्यासाठी नियमावली आणि तरतूदीमध्येही बदल करण्यात आले आहेत.

घरूनच करा आधारवरचा पत्ता अपडेट

  • आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा आणि ‘प्रोसीड टू अपडेट ॲड्रेस’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ओटीपी वापरून लॉगिन करा.
  • ‘पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
  • 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
  • OTP प्रविष्ट करा आणि लॉगिन करा.
  • ‘अपडेट न्यू ॲड्रेस प्रूफ’ हा पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता प्रविष्ट करा.
  • यानंतर, ॲड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाची कागदपत्रे निवडा.
  • पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • आधार अपडेट विनंती स्वीकारली जाईल आणि 14-अंकी अपडेट विनंती क्रमांक तयार केला जाईल.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....