Aadhaar Card | आधार कार्डसाठी उगा त्रास कशाला, UIDAI चा हा प्लॅन माहिती आहे का?
Aadhaar Card | आधार कार्डसाठी आता फार धावपळ करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नवीन योजना तयार केली आहे. काय आहे ही योजना?
Aadhaar Card | सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) हे ओळखपत्र (Identity Card) म्हणून महत्वाचा दस्ताऐवज झाला आहे. सरकारी योजनांचा फायदा हवा असेल वा बँकेत खाते उघडायचे असेल अथवा इतर कामे करायची असेल तर आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून मागितल्या जाते. पर्यटनस्थळी रुम बूक करण्यासाठी, हॉटेलमध्ये थांबण्यासाठीही आधारकार्डचा वापर करण्यात येतो. प्रत्येक क्षेत्रात आधार कार्डची गरज आहे. त्यामुळे आधार कार्डमधील नावात चूक झाली, पत्ता बदलला, जन्मतारखेत बदल अशा अनेक अडचणी आल्या तर आधार कार्डची दुरस्ती करणे (Update Aadhaar Card) आगत्याचे ठरते. आधार कार्डचा गैरवापर पाहता सरकारने ठराविक अधिकृत आधार सेवा केंद्रांनाच मुभा दिली आहे. पण अनेक ठिकाणी आधार केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यावर आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नवीन योजना तयार केली आहे. काय आहे ही योजना?
53 शहरात 114 केंद्र
या समस्येवर मात करण्यासाठी आणि लोकांना आधार कार्डमध्ये सहज दुरुस्ती करता यावी यासाठी UIDAIने देशभरातील 53 शहरात 114 आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार सेवा केंद्राची ही सेवा देशातील मेट्रो सिटी, राज्यांची राजधानी, केंद्र शासीत प्रदेशात सुरु करण्यात येणार आहे. सध्या UIDAI कडून देशभरात केवळ 88 केंद्र सुरु आहेत. ही सेवा केंद्र अत्यंत तोकडी असून त्यावर कामाचा अत्यंत भार आहे. या आधार केंद्रांव्यतिरिक्त देशभरात संलग्नीत 35,000 हून अधिक सेवा केंद्रही कार्यरत आहेत. ही सेवा केंद्र बँका, टपाल कार्यालये आणि राज्य सरकारमार्फत चालविण्यात येतात.
रविवारीही कामकाज
नवीन आधार कार्ड तयार करणे असो वा त्यात कोणत्याही प्रकारचा अधिकृत बदल करायचा असो हा बदल करता येतो. त्यासाठी या आधार सेवा केंद्रामार्फत आठवड्यातील सातही दिवस सेवा देण्यात येते. रविवारीही या केंद्रामध्ये कामकाज सुरु राहते. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या काळात ही सेवा केंद्रे सुरु असतात. या सेवा केंद्रांवर वयोवृद्ध आणि दिव्यांगाना विशेष सुविधा देण्यात येते. या ठिकाणी बायोमॅट्रीक पद्धतीने व्यक्तीचे नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अपडेट करता येतो. ही सेवा सशुल्क आहे.
आधार अपडेटचे शुल्क
आधार कार्ड नोंदणी : निशुल्क बायोमॅट्रिक अपडेट : 100 रुपये नाव, पत्ता, जन्मतारीख बदल : 50 रुपये लहान मुलांचे बायोमॅट्रिक : निशुल्क