Aadhaar Card : आधार कार्डबाबत मोठी वार्ता, UIDAI ने सुरु केली आता ही सुविधा

Aadhaar Card : सध्या आधार कार्डबाबत अनेक अपडेट येत आहे. पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यातच एका सुविधेमुळे आधार केंद्रांवर सध्या नागरिकांची गर्दी उसळली आहे.

Aadhaar Card : आधार कार्डबाबत मोठी वार्ता, UIDAI ने सुरु केली आता ही सुविधा
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 6:53 PM

नवी दिल्ली : आधार कार्डबाबत (Aadhaar Card) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. सध्या आधार कार्डबाबत अनेक अपडेट येत आहे. पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर आधार-पॅन जोडणीसाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तर केंद्र सरकार मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. पूर्वी ही मुदत 14 जून 2023 पर्यंत होती. आता नागरिकांना 14 सप्टेंबर, 2023 रोजी पर्यंत आधार कार्ड अपडेट करता येईल. आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाले असेल तर नागरिकांनी आधारमधील पत्ता आणि डेमोग्राफिक (Demographic) तपशील अपडेट करता येईल.

नवीन सुविधा आधार सुविधा केंद्रावर सध्या गर्दी आहे. चेहरा सत्यापन (face verifications) करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मे महिन्यात देशभरात 1.06 कोटी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. हा सर्वोच्च मासिक आकडा आहे. तर दुसऱ्या महिन्यात हा आकडा पुन्हा वाढला आहे.

का वाढली संख्या माहितीनुसार, चेहरा सत्यापन करण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. जानेवारी, 2023 मध्ये सत्यापन करण्याच्या तुलनेत मे महिन्यात चेहरा सत्यापन करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत 38 टक्के वृद्धी झाली. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) विकसीत केलेल्या या सुविधेचा वापर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे आधार सुविधा केंद्रांवर जाऊन नागरिक त्यांच्या चेहऱ्याचे सत्यापन करत आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे करण्यात येत आहे वापर या सुविधेचा वापर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान योजना, पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी होत आहे. या योजनांसाठी नोंदणी करण्यासाठी, या योजनांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलांसाठी अपडेट आधार कार्डचा वापर करण्यात येत असल्याने त्याचा वापर वाढला आहे.

खाते उघडण्यासाठी उपयोग याशिवाय या सुविधेचा वापर इतर सरकारी विभागातील योजनांसाठी होत आहे. काही सरकारी आणि खासगी बँका, त्यांचे प्रतिनिधी बँकेत खाते उघडण्यासाठी चेहरा सत्यापित केलेले आधार कार्ड मागत आहे. त्यासाठी आधार सेवा केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. आकडेवारीनुसार, देशात नागरिकांनी आधार कार्डमध्ये ही माहिती अपडेट करण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी मे महिन्यात 1.48 कोटी आधार कार्डमध्ये बदल करण्यात आला आहे. ते अपडेट करण्यात आले आहे.

कितीवेळा करता येते अपडेट आधार कार्डमधील माहिती अपडेट किती वेळा करता येते, असा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यासंबंधी काही नियम आहेत. त्यानुसार, नागरिकांच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. आधार कार्ड तयार करताना आणि माहिती भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.