‘या’ बँकेत ATM मधून कितीवेळाही पैसे काढा, कोणताही सरचार्ज लागणार नाही

ATM charge | क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जे शुल्क आकारले जाते त्याला इंटरचेंज शुल्क म्हणतात. एखाद्या ग्राहकाने स्वत:ची बँक सोडून अन्य बँकेच्या एटीएमचा वापर करुन पैसे काढले तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात, ती मर्चंट बँक असते.

'या' बँकेत ATM मधून कितीवेळाही पैसे काढा, कोणताही सरचार्ज लागणार नाही
एटीएम स्वॅप केले आणि पैसे निघाले नाहीत, तर बँक देणार भरपाई
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 6:50 AM

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे 1 ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यासंदर्भात नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली होती. त्यानुसार ATM मधून पाचपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. परंतु, Ujjivan Small Finance Bank च्या ग्राहकांना याचा फारसा फरक पडणार नाही. कारण या बँकेने ग्राहकांना कितीवेळाही ATM मधून पैसे काढण्याची मुभा दिली आहे.

RBI ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे. तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.

इंटरचेंज शुल्क म्हणजे काय?

क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जे शुल्क आकारले जाते त्याला इंटरचेंज शुल्क म्हणतात. एखाद्या ग्राहकाने स्वत:ची बँक सोडून अन्य बँकेच्या एटीएमचा वापर करुन पैसे काढले तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात, ती मर्चंट बँक असते.

याशिवाय, पुढील वर्षापासून ग्राहक शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे. बँकांना उच्च इंटरचेंज शुल्काची भरपाई करता यावी, यासाठी ग्राहक शुल्कात वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. याशिवाय, आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

डेबिट कार्डाशिवाय पैसे काढा

आयसीआयसीआय बँकेकडून काही दिवसांपूर्वीच एक नवी सुविधा सुरु करण्यात आली होती. त्यासाठी आपल्याला आयसीआयसीआय बँक एटीएम(ICICI Bank ATM)वर जावे लागेल. तिथे तुम्हाला ‘Cardless Withdrawal’वर क्लिक करावे लागेल आणि नंतर ‘Mobile Number’ लिहा आणि ‘Reference number’, ‘Temporary PIN’, ‘Amount’ आदि माहिती भरावी लागेल. Reference number साठी आपल्याला मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर जावे लागेल. येथे, ‘Cardless Cash Withdrawal’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, एक पिन प्रविष्ट करावा लागेल. यानंतर एक Reference number तयार होईल, त्या आधारावर आपण पैसे काढू शकता. आपल्याला एटीएममध्ये हा Reference number प्रविष्ट करावा लागेल.

संबंधित बातम्या:

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम

ICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार?

ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!

(ATM Transactions charge will be waived off for Ujjivan Small Finance Bank customers)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.