म्हातारपणी पैशांची काळजी करु नका, NPS अकाऊंट उघडा आणि चिंता विसरुन जा
NPS Pension | राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही 60व्या वर्षानंतर 60 टक्के रक्कम काढू शकता. यावर कोणताही कर लागत नाही. तसेच गरज पडल्यास 60व्या वर्षाच्या आधीही 25 टक्के रक्कम काढू शकता.
नवी दिल्ली: आता वयाच्या चाळिशीत पोहोचला असाल तर एव्हाना तुम्ही एकदातरी निवृत्तीनंतरच्या आयुष्याविषयी विचार केला असेल. निवृत्तीनंतर आयुष्य सुखात जगायचे असेल तर पैशांचे नियोजन करण्याविषयीचे विचार तुमच्या मनात घोळत असतील. अशा लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. ही एक सरकारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही महिन्याला 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. या हिशेबाने तुम्ही वर्षाला NPS मध्ये सहा हजार रुपये जमा कराल. 18 ते 70 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती National Pension System योजनेत पैसे गुंतवू शकते.
NPS खाते कसे सुरु कराल?
NPS योजनाही ही नोकरदार, व्यवसायिक आणि फ्रीलान्सर्स अशा सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही घरसबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही NPS खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला निश्चित गुंतवणूक करावी लागेल. एनपीएस पेन्शन फंड रेग्युलेटरी अँण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) कडून NPS चे नियंत्रण केले जाते. सरकारी योजना असल्यामुळे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
एनपीएस खाते उघडण्यासाठी प्रथम पीएनबीच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा. ऑनलाईन ग्राहक नोंदणी पानावरील नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा. आपला व्हर्च्युअल आयडी नंबर प्रविष्ट करा आणि नोंदणीकृत नंबरवर ओटीपी मिळवा. एक स्वीकृती क्रमांक टाका आणि वैयक्तिक माहिती भरा. माहिती भरल्यानंतर PRAN क्रमांक मिळवा आणि लॉगिन करा.
NPS योजनेचे फायदे
पीपीएफसारख्या पारंपरिक कर बचत योजनांच्या तुलनेत NPS मध्ये जास्त रिटर्न्स मिळतात. या योजनेत 9 ते 12 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. तसेच या योजनेतील पैशांवर करमाफीचाही लाभ मिळतो. आयकरातील 80CCD(1), 80CCD(1b) आणि 80CCD(2) अंतर्गत NPS योजनेत लाभ मिळतो. या योजनेत गुंतवणुक केल्यास तुम्हाला 2 लाखांपर्यंतची करमाफी मिळू शकते.
राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही 60व्या वर्षानंतर 60 टक्के रक्कम काढू शकता. यावर कोणताही कर लागत नाही. तसेच गरज पडल्यास 60व्या वर्षाच्या आधीही 25 टक्के रक्कम काढू शकता. मुलांचे शिक्षण, लग्न आणि घर बांधण्यासाठी किंवा आजारपणाच्या काळात तुम्ही या पैशांचा वापर करु शकता.
संबंधित बातम्या:
‘या’ बँकांमध्ये बचत खात्यावर मिळतेय सर्वाधिक व्याज
ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे
सर्वाधिक व्याज देणाऱ्या पाच टॉप RD स्कीम; 50 रुपयांमध्ये खाते उघडा, 8 टक्के व्याज मिळवा