Saving Scheme : स्मृती ईराणी यांनी उघडले खाते, मग तुम्ही कशाला राहता मागे, असा होईल लाभ

Saving Scheme : या सरकारी अल्पबचत योजनेत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी पण खाते उघडले आहे. काय आहे ही योजना, काय होतो याच्यात फायदा, मग तुम्ही मागे कशाला राहता..

Saving Scheme : स्मृती ईराणी यांनी उघडले खाते,  मग तुम्ही कशाला राहता मागे, असा होईल लाभ
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:16 PM

नवी दिल्ली : तुम्हाला बचत करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरु शकते. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smruti Irani) यांनी नवीन सरकारी अल्पबचत योजनेचं खातं (Small Saving Scheme) उघडलं. विशेष म्हणजे त्यांनी रांगेत उभं राहून त्यांच्या नावे या योजनेत हे खाते सुरु केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. महिलांना बचती सवय लावून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत काही फायदे असले तरी सरकारी नोकदार महिलांनी या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी अटी व शर्तींची माहिती आवश्य घ्यावी. ही योजना बचतीवर चांगला परतावा देते.

बचतीतून महिलांचा सन्मान केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी संसद भवन परिसरातील पोस्ट कार्यालयात महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे खाते उघडले. याविषयीचे फोटो माध्यमात दिसून आले. त्यांनी रांगेत उभे राहून खाते उघडले. त्यानंतर या बचत योजनेविषयीची अनेकांची उत्सुकता ताणल्या गेली. या योजनेत कमी कालावधीत बचत करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करु शकता.

काय आहे महिला सम्मान सेव्हिंग स्कीम? महिला सम्मान सेव्हिंग स्कीममध्ये महिला, मुली त्यांचे खाते उघडू शकता. या योजनेत दोन वर्षांकरीता पैसा गुंतविता येतो. या योजनेवर टपाल खात्याकडून जोरदार परतावा मिळतो. जर तुम्हाला पण कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर ही एक चांगली बचत योजना आहे. या योजनेत तुमची रक्कम एकदम सुरक्षित असते.

हे सुद्धा वाचा

किती मिळतो परतावा महिला सन्मान बचत योजनेत तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या बचतीवर तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळते. या योजनेत 2 वर्षांकरीता गुंतवणूक करता येते. या योजनेत व्याजाचे दर तीन महिन्यानंतर निश्चित होतील. केंद्र सरकार हे व्याजदर निश्चित करतात. या योजनेत 2 वर्षांकरीता गुंतवणूक केल्यास 2 लाख 32 हजार रुपये मिळतील.

इतकी काढता येईल रक्कम या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येईल. गरजेच्यावेळी रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकेल. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.

करा खाते बंद

  1. खातेदाराचा मृत्यू झाल्यास तेव्हा खाते बंद करता येईल
  2. खातेदार गंभीर आजारी असेल, त्याला असाध्य रोग असल्यास
  3. लहान मुलीचा मृत्यू झाल्यास, त्याचा नावाचे खाते बंद करता येईल
  4. आर्थिक विवंचना असेल, त्यासंबंधीची अडचण पटवून दिल्यास खाते बंद होईल
  5. इतर काही कारण असेल तर व्याजदराच्या अटींची पुर्तता करुन खाते बंद होईल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.