अफवांवर विश्वास ठेऊ नका, UPI पेमेंट करा बिनधास्त

युपीआयने तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा मर्चंटच्या बँक खात्यावर तुम्ही पैसे पाठवत असतात. यासाठी १ एप्रिलपासून शुल्क लागणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर आता एनपीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका, UPI पेमेंट करा बिनधास्त
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 3:34 PM

नवी दिल्ली : मोबाईल क्रांतीनंतर देशात डिजिटल क्रांती आली. या डिजिटल क्रांतीत वारंवार बँकेत जाण्याची गरज उरली नाही. यामुळे ती लोकप्रिय झाली. परंतु या युपीआय पेमेंटसंदर्भात काही बातम्या सुरु झाल्या आहेत. यामुळे NPCI ने प्रसिद्धपत्रक काढून खुलासा केला आहे. म्हणजे UPI पेमेंटसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क लागणार नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या डिजिटल माध्यमांद्वारे दिलेल्या पैशांवर कोणतेही शुल्क लागणार आहे, यासंदर्भात एनपीसीआयने परिपत्रक काढले आहे.

मग कोणाला लागणार शुल्क

तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा मर्चंटच्या बँक खात्यावर पैसे पाठवले तर तुम्हाला कोणतेही शुल्क लागणार नाही. पीयर टू पीयर आणि पीयर टू पीयर मर्चंट ट्रान्झॅक्शनवर या शुल्काचा परिणाम होणार नाही. तुम्ही एखाद्या व्यापाऱ्यास पेमेंट युपीआयने करत असाल तरी तुम्हाला शुल्क लागणार नाही. परंतु त्या व्यापाऱ्यास १.१ टक्क्यांपर्यंत इंटरचेंज शुल्क आकारलं जाईल. जसे क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे शुल्क लागेत.

कोण भरणार हे शुल्क?

उदाहरणार्थ, जर तुम्ही दुकानामध्ये युपीआयद्वारे पीपीआय पेमेंट करणार आहात, तर व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारलं जाणार आहे. या व्यवहारांसाठी युझरकडून शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या खात्यात किंवा मित्र अन् नातेवाइकांना पैसे पाठवल्यास त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

काय आहे युपीआय

UPI म्हणजे युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस एक जलद पेमेंट सेवा आहे. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते. भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) ही पेमेंट पद्धत विकसीत केली आहे. व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस (VPA) या माध्यमातून बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नसते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानण्यात येते.

आता परदेशातही सेवा

युपीआय व्यक्ती ते व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती ते व्यापारी (P2M) यांच्यादरम्यान व्यवहारांना परवानगी देते. UPI प्रमाणेच सिंगापूरच्या Pay Now सेवा देते. वापरकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन एका बँक अथवा ई-वॉलेट खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम पाठवते अथवा प्राप्त करते. देशातील बँका आणि खासगी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून पेनाऊ व्यवहार पूर्ण करते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....