Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या नावावर बोगस सीम कार्ड तर नाही? घरबसल्या माहिती मिळवा, अन्यथा कारवाईची भीती

काही संवदेनशील राज्य वगळता देशभरात दुरसंचार विभागाने नागरिकांना 9 सीमकार्ड ठेवण्याची परवानगी दिली आहे. 9 पेक्षा अधिक सीम कार्ड असणा-या लोकांना या सीमकार्डची शहानिशा करावी लागणार आहे. 

तुमच्या नावावर बोगस सीम कार्ड तर नाही? घरबसल्या माहिती मिळवा, अन्यथा कारवाईची भीती
पेगासस हेरगिरी प्रकरण : समितीचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:59 AM

मुंबई : आपण जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी आपल्या कामासाठी कोणत्याही झेरॉक्स सेंटरवर धडाधड ओळखपत्राच्या प्रति काढतो. पण या तुमच्या ओळखपत्राची एक शिल्लक प्रत काढून तिचा दुरुपयोग तर होत नाही ना याचा तुम्हाला साधा सुगावा सुद्धा लागत नाही. ओळखपत्राची झेरॉक्स एकाची, छायाचित्र दुसऱ्याचं आणि सीमकार्ड तिसऱ्यालाच असे अनेक फ्रॉड आपण दैनंदिन बातम्यांमध्ये वाचतो. परंतु, आपण काय करु शकतो, असे म्हणत दुर्लक्ष करतो. त्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी मिळते. तेव्हा यापुढे तुमच्या ओळखपत्राचा वापर करुन चौथ्याला गंडवल्या तर जात नाही ना, याची खात्री करण्यासाठी आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत…

देशात हजारो लोक रोज सीमकार्ड खरेदी करतात. काही जणांना तर माहिती ही नसते की त्यांच्या नावावर सीमकार्ड खरेदी करण्यात आले आहेत ते. मग एखाद्या गुन्ह्यात पोलीस शोध घेत येतात, तेव्हा आपल्या पाया खालची जमीन सरकलेली असते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी दूरसंचार खात्याने एक पाऊल उचललं आहे. एका व्यक्तीला फक्त 9 सीमकार्ड जवळ ठेवण्याचे, त्यामुळे 9 पेक्षा जास्त सीमकार्ड तुमच्याकडे असतील तर त्याची खातरजमा तुम्हाला करुन द्यावी लागणार आहे.

जम्मू-काश्मीर, आसाम, त्रिपुरा या सारख्या राज्यात सीमची संख्या प्रतिव्यक्ती 6 अशी मर्यादीत करण्यात आलेली आहे. इतर भागात मात्र हे प्रमाण 9 असे आहे. आता प्रश्न उरतो की, तुमचा आयडी वापरुन घेतलेल्या सीमकार्डचा. त्यामाध्यमातून कोणाला फसवण्यात येत असेल, एखाद्याची लूट करण्यात येत असेल तर थेट फटका तुम्हालाच बसेल. त्यामुळे तुमच्या ओळखपत्रावर तुम्ही सोडून इतर कोणी सीमकार्ड खरेदी तर केले तर नाही ना, भाऊ हे तुम्हाला कोण सांगेल…अर्थात सरकार आणि त्याचा दूरसंचार विभाग…कसे ते आम्ही सांगू की

अशी मिळवा बोगस सीमकार्डची माहिती

सीमचे हे बोगसकांड हाणून पाडण्यासाठी दूरसंचार विभागाने कंबर कसली आहे. टेलिकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) अशी प्रणाली या खात्याने विकसित केली आहे. त्यासाठी एक पोर्टल ही तयार करण्यात आले आहे.   tafcop.dgtelecom.gov.in असं त्याचा आयपी अँड्रेस आहे. या पोर्टलवर देशभरातील सध्या सुरु असलेल्या सर्व मोबाईलचा डाटा उपलब्ध आहे. यामाध्यमातून स्पॅम आणि फ्रॉड ला लगाम घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या पोर्टलचा तुम्हाला जबरा फायदा होणार भावड्यांनो. यावर तुमच्या नावावर किती सीम खपवल्या गेले याची माहिती लागोलाग तुम्हाला मिळेल आणि तुम्ही भविष्यातील संकटाला अगोदरच पायबंद घालू शकाल. अरे चिंता नको..लगेच सांगतो की…

अशी करा प्रक्रियाः

सर्वात अगोदर आपल्या गुगलबाबावर जाऊन tafcop.dgtelecom.gov.in असं सर्च करा अथवा थेट द्या पेस्ट करुन. या पोर्टलवर गेल्यावर समोरच्या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, वापरात असलेला बरं का. नाही तर सर्च कराल बंद केलेला क्रमांक. तसं करु नका. तुमचा वापरात असलेला मोबाईल क्रमांक नोंद करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तिथे नोंद करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ओळखपत्राआधारे सुरु असलेल्या सर्व क्रमांकाची कुंडली मिळेल. आता इथं थोडं बारकाईने धान्य द्या बरं का. तुमच्या समोरील अख्खी यादी दोन-तीनदा धुंडाळा. त्यात एखादा असा मोबाईल क्रमांक आहे का, जो तुमचा नाही, किंवा तुमच्या जवळच्या पैकी कोणी वापरत नसेल. आणि असा मोबाईल क्रमांक सापडला की त्वरीत तिथल्या तिथं तक्रार द्या ठोकून, हा आपला नंबर नाही म्हणून. ‘This is not my number’ हा जो त्या नंबर समोर पर्याय दिला आहे ना निवडा. वरच्या बॉक्समध्ये आयडीमध्ये तुमचे नाव लिहा. खालच्या बाजूने

Report हा पर्याय तुम्हाला खुणावेल. त्याचावर क्लिक करा. या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्हाला एक आयडी रेफरेंस क्रमांक देण्यात येईल. थोड्यावेळाने तुमच्या नावावर सुरु असलेला हा फ्रॉड नंबर बंद करण्यात येईल.

वाचलं ना, मग करा की व्हायरलः

कसं सोप्पं आहे की नाही, आहो तुम्ही फक्त बोटं चालवायची फोनवर आणि चमत्कार बघायचा. आता अशा धोकेबाजांना तुम्हाला धडा शिकवावाच लागेल. गरीब आणि अडाणी लोकांच्या ओळखपत्राचा आधार घेत त्यांना ठगविण्यात येते. तेव्हा या लोकांना फसवणुकीपासून वाचवायचं असेल तर आपल्याला एकच करायचं ही माहिती व्हायरल करायची, बस्स. बोगसगिरी करणा-यांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाही.

अबब! घरताच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घरताच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.