Voluntary Provident Fund | गुंतवणुकीवर हमी, परताव्यात पण नाही कमी, हा फंड नेमका आहे तरी काय

Voluntary Provident Fund | ईपीएफओमध्ये (EPFO) गुंतवणूक करणाऱ्यांना व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंडाचा लाभ मिळतो. यामधील गुंतवणूक ही भविष्यासाठी एक उत्तम पर्याय मानण्यात येतो. या फंडात तुमची गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. यामधील गुंतवणुकीवर जास्त रिटर्न मिळतो. व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंडाचे अनेक फायदे आहेत.

Voluntary Provident Fund | गुंतवणुकीवर हमी, परताव्यात पण नाही कमी, हा फंड नेमका आहे तरी काय
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 6:34 PM

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी व्हॉलंटरी प्रोव्हिडंड फंडचा (Voluntary Provident Fund) फायदा मिळतो. हा गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय मानण्यात येतो. या योजनेत तुमचा पैसा सुरक्षित राहतो. या गुंतवणुकीत जोरदार परतावा मिळतो. व्हॉलंटरी प्रोव्हिडंड फंडचे अनेक फायदे आहेत. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या फंडचा वापर करण्यात येतो. या फंडमध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत मुदत ठेव, बचत खाते, पीपीएफ आणि एनएससी या योजनेपेक्षा अधिकचा परतावा मिळतो. या योजनेतील गुंतवणूक नोकरदार वर्गासाठी सर्वोत्तम ठरते.

पेन्शनचा लाभ

कोणतीही कंपनी वा संस्थेत काम करणारे कर्मचारी वेतनातील एक निश्चित रक्कम ईपीएफ खात्यात जमा करतात. या निधीवर केंद्र सरकार व्याज देते. ही एक प्रकारची गुंतवणूक असते. त्याचा लाभ निवृत्तीनंतर पेन्शनच्या रुपाने मिळतो. यामध्ये कर्मचाऱ्यांसोबत कंपनीला पण योगदान द्यावे लागते.

हे सुद्धा वाचा

वेगळे खाते उघडण्याची नाही गरज

व्हॅलंटरी प्रोव्हिडंट फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र खाते उघडण्याची आवश्यकता नाही. या फंडात तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो. या गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेतील व्याज हे सेक्शन 80C अंतर्गत करमुक्त असते. EPFO मधील सदस्यांसाठी VPF ही योजना तयार करण्यात आलेली योजना आहे. कर्मचारी त्यांच्या पगारातील कितीही रक्कम VPF मध्ये जमा करु शकतात. मात्र, ही रक्कम पीएफच्या 12 टक्क्यांपेक्षा अधिक नको. कर्मचाऱ्यांना वाटल्यास ते आपली संपूर्ण बेसिक सॅलरही VPF टाकू शकतात.

कशी करावी गुंतवणूक?

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असले तर तुम्हाला अगोदर तुमच्या कंपनीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पीएफ रक्कमेत वाढ करावी लागणार आहे. HR च्या मदतीने ईपीएफ खात्यासोबतच कर्मचाऱ्याला व्हीपीएफ खाते उघडता येते.

व्हॅलंटरी प्रोव्हिडंट फंडाचा लाभ काय

पीएफ खात्यातील योगदानावर 8.15 टक्के दराने व्याज मिळते.

गुंतवणूकदारांना व्हीपीएफ योजनेत पीपीएफ पेक्षा जास्त व्याज मिळते

पीपीएफ योजनेत दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते

व्हीपीएफ योजनेत कितीही गुंतवणूक करता येते

या फंडात कमीत कमी पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते

पाच वर्षांनी तुम्हाला पैसा काढायचा असेल तर कर द्यावा लागत नाही

आयकर अधिनियम 1961 च्या 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंत कर सवलतीचा लाभ

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.